
पाचोड : फरशी बसविण्याच्या ठेकेदाराकडून तीन लाख रुपयांची खंडणी उकळण्यासाठी विहामांडवा (ता.पैठण) येथील चौकडीने त्याचे अपहरण करून रिव्हालरची एक गोळी झाडून ५३ हजार ७०० रुपये उकळून उर्वरित रक्कम पंधरा दिवसांत न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची भयावह घटना नालेवाडी (ता.पैठण) शिवारात बुधवारी (ता.२५) घडली असून पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी शनिवारी (ता.२८) चौघां जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पाचोड पोलिस ठाणेतंर्गत बीडप्रमाणे शस्त्रे उदंड होऊन परिसरात अशा घटना घडत असल्याने सर्वसामान्यांत दहशत निर्माण झाल्याचे दिसून येते.