babasaheb patil
sakal
चाकूर - येथील तालूका कृषी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरूवारी (ता. १८) सकाळी साडे अकरा वाजता अचानक कार्यालयाला भेट दिली असता फक्त तीन कर्मचारी हजर होते, तालूका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी गैरहजर असल्यामुळे तहसीलदारांना कार्यालयाचा पंचनामा करून कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.