नांदेड ग्रामिण भागातील परिक्षेत कॉपी, आठ पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल

file photo
file photo

नांदेड : इयत्ता दहावीच्या परिक्षेमध्ये परिक्षा देणारे विद्यार्थी यांना कॉपीसारखा गैरप्रकार सुरू असतांना तिकडे दुर्लक्ष करुन वरिष्ठांचे आदेश पायदळी तुडविण्याचा ठपका ठेवून आठ पर्यवेक्षकांवर कंधार पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दिग्रस (ता. कंधार) येथी परिक्षा केंद्रावर उडकीस आला. 

सध्या दहावीच्या परिक्षा सुरू आहेत. जिल्ह्यात कॉपीमुक्त परिक्षा पार पाडाव्यात अशा कडक शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. तरीसुद्धा ग्रामिण भागात काही संस्थाचालक शिक्षकांना हाताशी धरुन विद्यार्थ्याना कॉपी पुरविण्याचे काम करत आहेत. 

कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यावर रेस्टतिकीटचा बडगा 

अशा कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यावर रेस्टतिकीटचा बडगा उगारला आहे. विशेष पहिल्यांदाच पर्यवेक्षक (गार्डींग करणारे) यांच्यावर जबाबदारी निश्‍चित केली आहे. ज्या परिक्षा हॉलमध्ये कॉपी करतांना काही विद्यार्थी आढळले तर त्यांच्यावर तर कारवाई होतच असून संबंधीत पर्यवेक्षकावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

दीग्रस बु. (ता. कंधार) येथील शिवाजी विद्यालयातील प्रकार

असाच प्रकार दीग्रस बु. (ता. कंधार) येथील शिवाजी विद्यालयात भरारी पथकांनी शनिवारी (ता. १४) या केंद्रावर जावून पहाणी केली असता परिक्षा हॉल क्रमांक तीन, चार, सहा, सात, १०, ११ आणि १२ मध्ये कॉपी करतांना अनेक विद्यार्थी सापडले. त्यांची उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत.

या पर्यवेक्षकांवर झाला गुन्हा दाखल

तसेच शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक हिराप्रकाश शंकरराव बोडावार यांच्या फिर्यादीवरुन एन. एल. पवार (जनता हायस्कुल कौठा), व्यंकटी कानगुले (जनता हायस्कुल कौठा), एस. आर. पवार ( शिवाजी हायस्कुल हाळदा), आर. के. घोडजकर ( मनोविकास माध्यमिक विद्यालय, कंधार), डी. टी. बंगलवार (मनोविकार माध्यमिक विद्यालय, कंधार), एस. डी. देवकते (नाईक विद्यालय, दिग्रस बु.) आणि एस. टी. राऊतवाड ( सोमानाईक माध्यमिक आश्रम शाळा रामानाईक तांडा, कंधार) यांच्याविरुद्ध परिक्षा केंद्रावर गैरप्रकार चालु असतांना त्याकडे दुर्लक्ष करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. व्यवहारे करत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com