परळीतील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर 31 मार्चपर्यंत बंद 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. याचा प्रसार होवू नये यासाठी देशात व राज्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रभू वैद्यनाथाच्या येथील मंदिरातील दर्शन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहे.

परळी वैजनाथ (जि. बीड) - देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाच्या येथील मंदिरातील दर्शन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी काढले आहेत. 

संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. याचा प्रसार होवू नये यासाठी देशात व राज्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालयानंतर आता धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता राज्यातील सर्व महत्वाची मंदिरे मंगळवारपासून (ता. १७) बंद करण्यात आली आहेत.

हेही वाचा - कोरोना विषाणू  येऊच नये म्हणून....

याच संदर्भात जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सोमवारी (ता.16) येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वैद्यनाथ मंदिर 31 मार्चपर्यंत देवदर्शनासाठी बंद करण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. मात्र पुजारी रोजची पुजाअर्चा करु शकतील. फक्त पर्यटक व देवदर्शनासाठी येणारे भाविक भक्तांसाठी मंदिर प्रवेश बंद करण्यात आला आहे तसेच सर्व मंगल कार्यालय, मँरेज हॉल 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaidyanath Temple closed till 7th March