Coriander Crop : कोथिंबिरीने केले ४० दिवसांत लखपती; धारूर येथील नितीन शिनगारेंना २ एकरांत ७ लाखांचे उत्पन्न

युवा शेतकरी आधुनिकतेची कास धरत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीतून विक्रमी उत्पादन काढत आहे
Coriander crop 7 lakhs income from 2 acres Nitin Shingare farmer beed
Coriander crop 7 lakhs income from 2 acres Nitin Shingare farmer beedSakal
Updated on

- ईश्वर खामकर

किल्लेधारूर : धारूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी आता आधुनिकतेची कास धरत आधुनिक शेती करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भरघोस उत्पादन होऊन आर्थिक उन्नती साधली जात आहे. कसबा भागातील नितीन शिनगारे यांनी आपल्या दोन एकर शेतीवर कोथिंबीर लावली. योग्य नियोजनामुळे व मिळालेल्या भावामुळे त्यांनी सात लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ असल्याने पाण्याची उपलब्धी अत्यल्प प्रमाणात आहे. यामुळे शेती पिकवणे मोठ्या जिकीरीचे काम आहे. मागील काही वर्षांपासून मॉन्सूनच्या बदलत्या वातावरणामुळे शेती पिकाला मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

मात्र आता युवा शेतकरी आधुनिकतेची कास धरत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीतून विक्रमी उत्पादन काढत आहे. धारूर येथील कसबा भागातील नितीन शिनगारे यांनी आपल्याकडे असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेवर दोन एकर शेतीत ९५ किलो कोथिंबीर (धने) पेरणी केली होती.

Coriander crop 7 lakhs income from 2 acres Nitin Shingare farmer beed
Nanded Airport : नांदेड विमानतळाची सुरक्षा धोक्यात; संरक्षक भिंतीला भगदाड

योग्य नियोजनामुळे दोन एकर शेतीतून ४० दिवसांत ६५ क्विंटल उत्पादन निघाले. या उत्पादनाला जागेवर १२० रूपये प्रती किलोने बाजार भाव मिळाला. यामुळे सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न ते मिळवू शकले आहेत.

‘प्रयोगशीलता जपायला हवी

हंगामी पिकातून योग्य नियोजन केल्यास हमखास उत्पन्न मिळते. पारंपरिक शेतीला काही प्रमाणात फाटा देऊन आधुनिकतेची कास धरत इतर असे प्रयोग करणे गरजेचे आहे, असे नितीन शिनगारे सांगतात.

तालुक्यातील बरेच शेतकरी आता वेगवेगळी शेती करून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. अशा शेतकऱ्यांचा अनुभव घेऊन इतर शेतकऱ्यांनीही हंगामी पिकांकडे वळले पाहिजे. कृषी विभाग त्यांना कायम मार्गदर्शन करेल.

- श्रीनिवास अंडील, कृषी सहाय्यक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.