कोरोना : १७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

आतापर्यंत परभणी जिल्ह्यात २५१ संशयितांची नोंद झाली आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

परभणी : परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संशयित म्हणून तब्बल २५३ जणांची नोंद झाली असून त्यापैकी स्वॅब घेण्यात आलेल्या २०३ पैकी १७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी (ता.सात) दाखल आठ संशयितांचे स्वॅब औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.

आतापर्यंत परभणी जिल्ह्यात २५१ संशयितांची नोंद झाली आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात सध्या १३ जणांची रवानगी करण्यात आली आहे, तर ११८ जणांचे घरी विलगीकरण करण्यात आले आहे. २५३ संशयितांनी विलगीकरणाचा कालवाधी पूर्ण केला आहे. संशयितांमध्ये परदेशातून आलेले ६२ जण असून त्यांच्या संपर्कात आलेले सहाजण आहेत. या सर्वांना प्रशासनाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. एकूण २०३ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. ते स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले असता त्यापैकी १७४ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत, १३ स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे, तर १६ स्वॅबची तपासणीची गरज नसल्याचा निर्वाळा पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिला आहे.

हेही वाचा- घरपोच किराणासाठी प्रशासनाचे ‘ॲप’ ​

हेही वाचा...

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
सोनपेठ (जि.परभणी):
सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळास कंटाळून एका विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. सहा) घडली. याप्रकरणी सोनपेठ पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोनपेठ शहरातील संभाजी नगर येथे राहणाऱ्या प्रियंका महावीर सोट या तरुण विवाहितेने सासरच्या मंडळींकडून मारहाण व छळास कंटाळून सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत विवाहितेचा मामा कल्याण सोन्नर याच्या फिर्यादीवरून पती महावीर सोट, सासू सुशीलाबाई सोट, किशाबाई बर्वे, शीतल पांढरे व दत्ता पांढरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सोनपेठ पोलिसांनी मंगळवारी (ता. सात) गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा...
सारंगापूर येथे तरुणाची आत्महत्या
मानवत (जि.परभणी) :
सारंगापूर (ता. मानवत) येथील विजय माधवराव चोखट (वय २५) यांनी आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. सात) सकाळी आठच्या सुमारास घडली. दरम्यान, आत्महत्येचे कारण आद्यापही समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई, वडील व दोन लहान भाऊ आहेत. या प्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात आकस्मित मुत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: 174 reported negative,parbhani news