Corona Breaking ; सेलूतील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, परभणी जिल्ह्यातील पाचवा बळी

corona
corona

सेलू: शहरातील साठ वर्षीय कोरोनाबाधित व्यापाऱ्याचे गुरुवारी (ता.नऊ) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती शासकीय रुग्णालयाने दिली.

सेलू शहरातील शास्त्री नगरातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीचा मंगळवारी (ता.सात) सायंकाळी कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह अहवाल आला होता. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. बुधवारी (ता.नऊ) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परभणीला अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरिल प्रतिष्ठित व्यापारी असल्याने व्यापारीपेठेसह शहरात मोठी अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्णांचा आकडा सोळा झाला असल्याने चिंतेचा विषय आहे. 

३९ व्यक्तींचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत
कोरोना बाधित रूग्णाच्या सहवासात आलेला जवळपास ३९ व्यक्तींचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या तहसील रस्त्यावर असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोअर केअर सेंटरमध्ये ३५ व स्टेशन जवळील गोविंदा लाॅजमध्ये १४ व्यक्ती क्वारंन्टाइन आहेत. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आदेशाचे पालन करावे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे, मास्कचा वापर करावा, स्वच्छता बाळगावी, गर्दी करू नये असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.

नागरिकांत भीती 
शहरात व ग्रामीण भागात मोठ्या शहरातून व्यक्ती येत असल्याने त्यांनी आरोग्य तपासणी करून  क्वारंन्टाइन राहणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने   गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. कोरोना बाधित रुग्णाचा सहवासात आल्याने विलगीकरण झालेल्या नागरिकांनी आपण उगाच आलो, कोरोना बाधित नातेवाईकांच्या संपर्कात, उगीच भेटलो, कशी दुर्बूद्धी आली, अशी प्रतिक्रिया विलगीकरणात असलेल्याने देखभाल करीत आरोग्य कर्मचाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. 

सेलू शहरात चार दिवस कडक संचारबंदी
सेलू: शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकारी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील दोन व इतर एक असे तीन कोरोना बाधितांचे अहवाल मंगळवारी (ता.सात) प्राप्त झाले. शहरात व तालुक्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्यामुळे सेलू नगरपरिषद क्षेत्रात बुधवारी (ता.आठ) ते शनिवार (ता.११) पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष दिपक मुगळीकर यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत.

शनिवारपर्यंत संचारबंदी 
शहरातील हसमुख काॅलनीतील दोन विवाहित महिलांनी कोरोनावर मात केल्याने गुरुवारी (ता.दोन) त्यांना सुट्टी झाली. शहरासह तालुका कोरोनामुक्त झाल्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतू, पुणे येथून तालुक्यातील वाई गावात आलेला एक व शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एक अधिकारी व त्यांच्या सहवासातील दोन कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्यामुळे महसूल, नगर परिषद व आरोग्य विभागासह नागरिक धास्ताऊन गेले.
जिल्ह्याच्या नागरी भागात बाहेरुन येत असलेल्या व्यक्तीची तपासणी केल्यानंतर कोरोना बाधित आढळून येत असल्याने व सेलू शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे शहर तसेच नगर परिषदेच्या हद्दीतील तीन किलोमीटर परिसरात बुधवारी (ता.आठ) दुपारी तीनपासून ते शनिवारी (ता.११) चे मध्यरात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.

परभणी कोरोना मिटर
एकूण पॉझिटिव्ह - १८६
उपचार सुरू - ७४
बरे झालेले - १०७
एकूण मृत्यू - पाच
आजचा मृत्यू - एक 


(संपादन ः राजन मंगरुळकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com