esakal | Corona Breaking ; हिंगोली जिल्ह्यात चार पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

mukta

कोरोना पॉझिटिव्हचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामध्ये पूणे, मुंबई येथून परतलेल्यांचा समावेश आहे. यामुळे पुणे-मुंबई कनेक्शन हिंगोलीकरांची धाकधूक वाढवत आहे.

Corona Breaking ; हिंगोली जिल्ह्यात चार पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केंद्रा बू. येथील दोघांना (वय २३, २६) तसेच अंधारवाडी आणि वसमत येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. याबाबतचा अहवाल सोमवारी (ता.२९) रात्री साडेनऊच्या सुमारास आला. दोघेही पूणे येथून परतलेले आहेत. 

परभणीत चार कोरोना पॉझिटिव्ह
झरी : झरी (ता. परभणी) येथील तिघांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा अहवाल सोमवारी (ता. २९) जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला. तसेच सायंकाळी सहाच्या सुमारास परभणी शहरातील बी. रघुनाथ महाविद्यालया जवळ असलेल्या धनलक्ष्मी नगरात एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा भाग सील करण्यात आला आहे. दिवसभरात एकुण चार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. झरी येथील एका कुटुंबात नाशिक येथील घोटी परिसरातील एक व्यक्ती झरी येथे शनिवारी (ता. २०) आला होता. त्याने या गावात दोन दिवस मुक्काम ही केला होता. त्यानंतर तो परत नाशिक येथे परतला. नाशिक येथे गेल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे या नातेवाइकांच्या संपर्कात आलेल्या झरी येथील तिघांना ता. २७ जून रोजी क्वारांटाइन करण्यात आले होते. या तिघांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल सोमवारी (ता. २९) प्राप्त झाला. त्यातील तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११३ वर पोचली असून ९० कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. तसेच सायंकाळी सहाच्या सुमारास परभणी शहरातील बी. रघुनाथ महाविद्यालया जवळ असलेल्या धनलक्ष्मी नगरात एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा भाग सील करण्यात आला आहे.

हेही वाचा - संचारबंदीचे कडेकोट पालन, बाजारपेठ निर्मणुष्य ; कुठे ते वाचा...

झरी येथील १३ जण क्वरंटाइन
झरी येथील एकाच कुटुंबातील तिघेजण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्या तिघांच्या संपर्कात आलेले इतर १३ जणांना सोमवारी (ता. २९) क्वरंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती झरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचा - टंचाईच्या कामांना मरगळ, ११६ पैकी सहा कामे पूर्ण

झरीत दोन दिवस संचारबंदी लागू
झरी येथील तीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी या गावात सोमवारी (ता. २९) रात्री १२ वाजल्यापासून बुधवारी (ता. एक) रात्री १२ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात गावातील व्यक्तींनी रस्त्यावर फिरू नये, सर्व व्यवहार काटेकोरपणे बंद ठेवावेत, असेही आदेशाद्वारे नमूद केले आहे. जी व्यक्ती याचे उल्लंघन करेल, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही दिला आहे.

हिंगोली जिल्हा 
एकूण पॉझिटिव्ह - २७०
उपचारानंतर बरे झालेले - २३८ 
उपचार सुरु - ३२ 
मृत्यू - शून्य 

 

loading image