esakal | Corona Breaking ; परभणीत बॅँक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह...
sakal

बोलून बातमी शोधा

corona

परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यातच रविवारी परभणी शहरात राहणाऱ्या व सेलू येथे बॅँकेत कार्यरत असलेल्या एका बॅँक अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आधीच तीन दिवसांची सुरु असलेली संचारबंदी रविवार (ता.पाच) रात्रीपासून (ता.आठ) पर्यंत तीन दिवसांसाठी वाढविली आहे. 

Corona Breaking ; परभणीत बॅँक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी ः जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोविड कक्षात ४२ रुग्ण उपचार घेत आहेत. यात ४० रुग्ण हे परभणी जिल्ह्यातील, तर ठाणे व पुणे येथे कोरोनाबाधित आढळलेल्या दोघांवरदेखील या ठिकाणी उपचार सुरू आहेत. रविवारी (ता.पाच) परभणीतील विष्णुनगर परिसरात एक रुग्ण आढळून आला आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४२ वर गेली आहे. 

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण आता आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. सध्या परभणी जिल्हा रुग्णालयात एकूण ४२ रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी विष्णुनगर परिसरातील एक ३७ वर्षीय व्यक्ती कोरोना संक्रमित आढळून आला आहे. 

हेही वाचा -  शेतकऱ्यांना डिजिटल शेतीसाठी प्रोत्साहित करावे ; कोण म्हणाले वाचा...

९८ रुग्ण कोरोनामुक्त 
सद्यःस्थितीत जिल्ह्यामध्ये कोरोना स्वॅब घेतलेल्या व कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त नोंद घेतलेल्या १४१ रुग्णांपैकी ९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. चार रुग्णांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिकेअंतर्गत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला मानवत तालुक्यातील इरळद गावातील एक रुग्ण जिल्हा रुग्णालय, परभणीत उपचार घेत आहे. तसेच सेलू तालुक्यातील वाई येथील रहिवासी व पुणे येथून परतलेल्या ३२ वर्षीय कोरोनाबाधित तरुणावरही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा - प्रधानमंत्री पिक विमा हप्ता भरण्याची मुदत ता. ३१ जुलैपर्यंत

रविवारी ३३ रुग्णांचे स्वॅब  
जिल्हा रुग्णालयाच्या वतीने रविवारी (ता.पाच) एकूण ३३ स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. या स्वॅबचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. रविवारी तीन स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक पॉझिटिव्ह, तर दोन निगेटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यातील संचारबंदीत तीन दिवसांची वाढ  
कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात संचारबंदी रविवारपर्यंत (ता.पाच) लागू कऱण्यात आली होती. जिंतूर व सोनपेठ तालुका वगळता परभणी व इतर तालुक्यात या संचारबंदीत रविवारी परत वाढ करण्यात आली. आता ही संचारबंदी बुधवारपर्यंत (ता. आठ) राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.