esakal | Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात तीन मृत्यू, ६० बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

corona

परभणी जिल्ह्यात बुधवारी (ता.१९) तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्यात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. एकूण मृतांची संख्या ८६ झाली आहे तर दिवसभरात ६० बाधितांची भर पडली.

Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात तीन मृत्यू, ६० बाधित

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यात बुधवारी (ता.१९) तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्यात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. एकूण मृतांची संख्या ८६ झाली आहे तर दिवसभरात ६० बाधितांची भर पडली. मृतांमध्ये परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट येथील ६० वर्षीय पुरुष आणि विवेक कॉलनी भागातील ६६ वर्षीय पुरुषाचा तर पुर्णा तालुक्यातील गौर येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

हेही वाचा - बिडकीनजवळ लांडग्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, तीस कोकरांचा मृत्यू

महापालिकेच्या रॅपिड टेस्टमध्ये नऊ पॉझिटिव्ह 
महापालिकेच्या वतीने बुधवारी (ता.१९) शहरातील १४ केंद्रावर ९५४ व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात ९४५ निगेटिव्ह तर फक्त नऊ टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. महापालिकेच्या वतीने शहरातील व्यापारी, विक्रेते, संशयित नागरिकांसाठी रॅपिड टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्हा क्रीडा संकुलातील बॅटमिंटन हॉल येथे गुरुवारपासून (ता.२०) शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी रॅपिड टेस्ट सुरू केल्या जाणार आहेत. ज्यांना कोरोनासदृश लक्षणे आहेत त्यांच्यासाठी येथे सुविधा करण्यात आली. अशा कर्मचाऱ्यांनी येताना सोबत शासकीय कार्यालयाचे ओळखपत्र व आधारकार्ड घेऊन यावे; तसेच कोरोना लक्षणे दिसून येत असल्यास नागरिकांनीही महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विविध सेंटरवर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले. आज अनेक केंद्रांवर नागरिकांच्या रांगा पाहावयास मिळाल्या तसेच परभणी योद्धे सामाजिक अंतर राखण्यासाठी प्रयत्नशील होते. केंद्रावर अनेक वेळा वेळेवर डॉक्टर, तंत्रज्ञ येत नाहीत; तसेच वारंवार टेस्ट किट संपल्याचे सांगितले जाते. महापालिका प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

हेही वाचा - नागरिकांच्या सहकार्यानेच लॉकडाऊनची मोहीम यशस्वी, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

जिंतूरला एका पोलिस कर्मचाऱ्यासह आठ पॉझिटिव्ह 
जिंतूर ः बुधवारी (ता. १९) पाचव्या दिवशीच्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये शहरातील एका पोलिस कर्मचाऱ्यासह आठजणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. बुधवारी ४७ व्यापाऱ्यांनी टेस्ट करून घेतली. त्यात जुनी मुनसफी भागात राहणारे एक सराफा, नामदेवनगरमधील एक व्यापारी असे दोनजण पॉझिटिव्ह आढळून आले. तर शहरातील शिवाजीनगरमधील एका किराणा व्यापाऱ्याचे आई-वडील पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या टेस्ट घेतल्या. त्यात चार सदस्य पॉझिटिव्ह आढळून आले, तर चारठाणा येथील पॉझिटिव्ह पोलिस कर्मचाऱ्यांचा संपर्क येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी आला म्हणून या नऊ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची टेस्ट घेण्यात आली. त्यात एक पोलिस कर्मचारी बाधित आढळून आला, तर तालुक्यातील भोगाव-देवी येथील एक महिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आली असता, तीही पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात बुधवारी एकूण ६७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात आठ नागरिक बाधित आढळून आले. 

बुधवारी रात्री साडेसातपर्यंतची आकडेवारी 

परभणी जिल्हा 
एकूण बाधित - १७३०
आजचे बाधित - ६०
आजचे मृत्यु - तीन
एकूण बरे - ७२२
उपचार सुरु असलेले - ९२२
एकूण मृत्यु - ८६

 

संपादन ः राजन मंगरुळकर