mukta
mukta

Corona Breaking ; हिंगोलीत तीन रुग्ण पॉझिटिव्ह, सर्व परजिल्ह्यातून आलेले 

Published on

हिंगोली ः जिल्ह्यात बुधवारी (ता.२४) रात्री साडेआठ वाजता आलेल्या अहवालात तीन रुग्ण वाढले आहेत. यामध्ये एक १८ वर्षीय तरुण, तर अन्य दोन महिला असून ज्यांची वय १८, ५५ आहेत. १८ वर्षीय तरुण हिंगोलीतील तलाबकट्टा येथील रहिवासी असून तो निलंगा (जि.लातूर) येथून आला आहे. तर दोन्ही महिला मुंबईहून हिंगोलीत परतल्या आहेत. त्या दोघीही मुळच्या हिंगोलीतील रहिवासी आहेत. तसेच दिवसभरात पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. 

आयसोलेशन वॉर्ड जिल्हा रुग्णालय हिंगोली येथील तीन तर वसमत येथील एक आणि एसआरपीएफचा एक जवान असे पाच जण बुधवारी (ता.२४) कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सुट्टी देण्यात आली. सध्या जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २५१ झाली आहे तर २२९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या २२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली.   

कळमनुरीत १८ नागरिकांचे घेतले स्‍वॅब नमुने
कळमनुरी ः येथील काझी मोहल्ला भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर येथे केलेल्या समुपदेशनानंतर बुधवारी (ता. २४) या भागातील १८ नागरिकांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून तपासणीकरिता त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. शहरातील काझी मोहल्ला भागातील एका वृद्ध महिलेला कोरोनाचे निदान झाल्याने आरोग्य विभागाने या महिलेच्या कुटुंबातील १५ सदस्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवून त्यांचे स्वॅब नमुने घेतले. आता यामध्ये दोन लहान मुलींना आजाराचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर प्रशासन व आरोग्य विभागाने या भागात लक्ष देत नागरिकांची आरोग्य तपासणी व सर्वेक्षण केले.

नागरिकांशी साधला संवाद
रुग्णाच्या आजूबाजूला वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, यासाठी या भागात मंगळवारी (ता. २३) निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. जायभाय, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद मेने, डॉ. बालाजी जाधव, डॉ. शिवाजी विसलकर, डॉ. महेश पंचलिंगे, डॉ. सोफिया खान, नगरसेवक खाजा, बागवान गफार कुरेशी, शेख वाजेद यांनी या भागातील नागरिकांच्या भेटी घेत त्यांना आजाराविषयी असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच अधिकाऱ्यांनी या भागातील नागरिकांची संवाद साधत त्यांचे समुपदेशन केल्यानंतर ४१ नागरिकांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होऊन स्वॅब नमुने देण्याची तयारी दाखवली. यापैकी बुधवारी १८ नागरिकांना कोविंड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. केंद्रात दाखल झालेल्या नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 


हिंगोली जिल्हा
एकूण पॉझिटिव्ह : २५१
उपचार घेत घरी परतलेले : २२९
उपचार सुरु : २२
मृत्यू : शून्य 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com