Corona Breaking ; हिंगोलीत दोन जण पॉझिटिव्ह

mukta
mukta

हिंगोली ः औंढा नागनाथ तालुक्यातील दोन जणांचे अहवाल शनिवारी (ता.२७) रात्री नऊच्या दरम्यान पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकितस्क डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. हे दोन्ही रुग्ण मुंबईहून परतले आहेत. या दोघांच्या संपर्कातील जवळच्या अकरा व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच आज पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

शनिवारी कळमनुरी येथील दोन रुग्ण तर वसमत येथील एक रुग्ण लिंबाळा केअर सेंटर येथील दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात एकूण पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत

शुक्रवारी होते आठ पॉझिटिव्ह 
शुक्रवारी रात्री प्राप्त अहवालानुसार औंढा तालुक्यातील भोसी येथील एका २२ वर्षीय गरोदर महिलेसह कळमनुरी तालुक्यातील सात व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. यात एसआरपीएफ जवान, एक नोएडा तर तिसरा मुंबईवरून गावी परतला आहे इतर चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कोरोना बाधित संपर्कातील असल्याचे डॉ.किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.

एकूण २७ रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २६१ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण क्वारंटाईन सेंटर व आयसोलेशन वॉर्ड मिळून ४४९३ रुग्णांना भरती केले आहे. त्यापैकी ३९५३ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३९०७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ५८४ रुग्ण भरती असून ३४५ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे डाँ श्रीवास यांनी सांगितले  आहे.

केअर सेंटरवर उपचार सुरु 
कळमनुरी येथे १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात काजी मोहला सहा, टव्हा एक, कवडा सहा , गुंडलवाडी दोन, बाबळी एक यांचा समावेश आहे. तर कोविड सेंटर कळमनुरी येथे चार रुग्णावर उपचार सुरू आहेत यामध्ये एसआर पीएफचे तीन जवान आहेत. तर वसमत येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. याशिवाय लिंबाळा येथील केअर सेन्टर येथे तीन रुग्ण आहेत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात जवळा बाजार येथील एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर सेनगाव येथे एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.

हिंगोली जिल्हा
एकूण पॉझिटिव्ह - २६१
उपचार घेत घरी परतलेले - २३४
उपचार सुरु - २७
मृत्यू -शून्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com