Beed Corona Update: उतरल्यावाणी वाटलेल्या कोरोनाची दुपटीने उसळी

शिरुरची रुग्णसंख्या सोमवारपेक्षा चौपट, शिरूर कासार तालुक्यातही आता कडक निर्बंध
covid 19
covid 19covid 19

बीड: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांत घट होण्याऐवजी वाढच सुरु आहे. सोमवारी (ता. १९) मागच्या अनेक दिवसानंतर रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट झाल्याने कोरोना ओसरतोय असे वाटत असतानाच मंगळवारी (ता. २०) नव्या रुग्णसंख्येने दोनशेंचाही टप्पा पार केला. विशेष म्हणजे अलीकडच्या काळातील सर्वोच्च पॉझिटिव्हिटी रेटचीही नोंद झाली. शिरूर कासार तालुक्यात सोमवारपेक्षा चौपट रुग्ण आढळले. सोमवारी १० रुग्ण आढळलेल्या या तालुक्यात मंगळवारी ४२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता या तालुक्यातही नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी पाटोदा, आष्टी व गेवराई तालुक्यासाठी असे आदेश लागू करण्यात आले होते. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी वरील तालुक्यांचा संबंध असलेल्या नगर जिल्ह्याची संख्या वाढलेली असल्याने सदर आदेश लागू केले होते.

आता शिरूर कासार तालुक्यासाठीही सकाळी सात ते दुपारी साडेबारा या वेळेतच शिथिलता असणार आहे. शनिवार व रविवारी केवळ आवश्यक सेवांची दुकाने सुरु राहतील, असे जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आदेशात म्हटले आहे. सोमवारी तीन हजार ५७९ लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. मंगळवारी हाती आलेल्या अहवालांत २११ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर तीन हजार ३६८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १०, आष्टी ४३, बीड ३६, धारुर ५, गेवराई १४, केज १०, माजलगाव पाच, परळी एक, पाटोदा २८, शिरूर ४२ व वडवणी तालुक्यात १७ रुग्णांचा समावेश आहे.

covid 19
Marathwada Corona Update: मराठवाड्यात ३४० कोरोना रुग्णांची वाढ

मंगळवारी दिवसभरात ९७ जण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. २४ तासांत एका येवता (ता.केज) येथील ८५ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात दोन हजार ५७७ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ९५ हजार १३६ इतकी झाली असून आतापर्यंत ९१ हजार २४६ जण कोरोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात एक हजार ३१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर बाहेर जिल्ह्यातही ५१ रुग्ण उपचाराखाली आहेत.

पॉझिटिव्हिटी रेटचीही उसळी-
कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सर्वत्र ओसरत असताना जिल्ह्याची रुग्णसंख्या दीडशे ते पावणे दोनशे होती. मात्र, पॉझिटिव्हिटी रेट (तपासण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण) पाचच्या कमीच होते. अलीकडच्या दहा दिवसांत ता. १३ जुलैला सर्वोच्च पॉझिटिव्हिटी रेट ४.९९ टक्के नोंदला गेला होता. तर, ता. १५ जुलै पासून हा दर चारपेक्षा कमीच होता. सोमवारी केवळ २.४९ टक्के इतक्या पॉझिटिव्हिटी रेटची नोंद झाली होती. परंतु, मंगळवारी तपासण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५.८९ टक्क्यांवर पोहचले.

‘म्युकर’च्या दोन रुग्णांची भर-
म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराच्या नवीन दोन रुग्णांची मंगळवारी भर पडली. आतापर्यंत जिल्ह्यात २०१ रुग्ण निष्पन्न झाले. मंगळवारी आणखी तीन रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. आतापर्यंत १२० जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या ३४ रुग्णांवर उपचार सुरु असून ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक रुग्णांवर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com