esakal | Marathwada Corona Update: मराठवाड्यात ३४० कोरोना रुग्णांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates

Marathwada Corona Update: मराठवाड्यात ३४० कोरोना रुग्णांची वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात मंगळवारी (ता. २०) दिवसभरात ३४० कोरोनाबाधित आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्येत बीड २११, उस्मानाबाद ४५, औरंगाबाद ३७, लातूर २१, परभणी १५, जालना ५, हिंगोली ३, नांदेडमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, औरंगाबादेत दोन, बीड-लातूर-उस्मानाबाद-नांदेडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून सरासरी रोज ४० ते ४५ रुग्ण आढळत आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून फक्त २८८ रुग्ण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात ३७ नवे रुग्ण आढळले. यात शहरातील ७ व ग्रामीण भागातील ३० जण आहेत. रुग्णसंख्या एक लाख ४७ हजार ५६ झाली. जिल्ह्यातील आणखी ३६ रुग्ण बरे झाले. त्यात महापालिका क्षेत्रातील ११, ग्रामीण भागातील २५ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एक लाख ४३ हजार २९१ रुग्ण बरे झाले आहेत.

हेही वाचा: Nanded Breaking News : नांदेडमध्ये गोळीबार, तरुण ठार

दरम्यान, पडेगाव येथील महिलेचा (वय ३५) घाटी रुग्णालयात तर गारखेडा परिसरातील महिलेचा (८०) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आतापर्यंत तीन हजार ४७७ जणांचा मृत्यू झाला.

शिरूरमध्ये निर्बंध कडक-
बीड : मराठवाड्यात संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरी बीड जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून दररोज दीडशे ते पावणेदोनशेच्या पुढेच रुग्ण आढळत आहेत. या काळात सर्वांत कमी रुग्णसंख्या (११३) सोमवारी (ता. १९) नोंदली गेली. तीत आज शंभरने भर पडून ही संख्या २११ वर पोचली. यातील शिरूर कासार तालुक्यात सर्वाधिक ४२ रुग्ण आहेत. त्यामुळे या तालुक्यात आवश्यक सेवेतील निर्बंध कडक करण्यात आले असून केवळ सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंतच शिथिलता असेल. यापूर्वी पाटोदा, गेवराई, आष्टी तालुक्यांसाठी याप्रमाणे निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिले आहेत.

loading image