esakal | Nanded Breaking News : नांदेडमध्ये गोळीबार, तरुण ठार
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडमध्ये फायरींग

Nanded Breaking News : नांदेडमध्ये गोळीबार, तरुण ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जुन्या नांदेडमधील (Nanded) गाडीपुऱ्यात रेणुकामाता मंदिराजवळ मंगळवारी (ता.२०) रात्री साडेसातच्या सुमारास गोळीबार झाला. प्राथमिक माहितीनुसार टोळीयुद्धातून ही घडली आहे. त्यात एक जण ठार झाला आहे. गोळीबार (Firing In Nanded) करणारा आरोपी पसार झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवारा पोलिस ठाण्याचे अधिकारी झाले आहेत.बुधवारी (ता.२१) बकरी ईद असून त्यानिमित्ताने पोलिस अधिकारी बंदोबस्त लावण्याच्या कामी व्यस्त असतानाच मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.(nanded breaking news youth killed in firing glp 88)

हेही वाचा: Corona Updates : नांदेडमध्ये सध्या कोरोनाचे ६४ रुग्ण

गोळीबारात मरण पावलेल्या तरुणाचे नाव विकी ठाकूर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार तपास सुरु करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी तत्काळ नाकेबंदी लावण्यात आली आहे.

loading image