esakal | कोरोना : नांदेड कारागृहातील पंधरा कैद्यांना जामिन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड कारागृहातील अशा १५ जणांना न्यायालयाने जामीन दिला आहे. सध्या नांदेड कारागृहात १६५ कच्चे कैदी स्थानबध्द आहेत. त्यांच्या आरोग्याकडे कारागृह प्रशासन विशेष लक्ष ठेवत असल्याचे कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले. 

कोरोना : नांदेड कारागृहातील पंधरा कैद्यांना जामिन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सध्या संबंध जगभरात कोरोना या जागतीक विषाणूने थैमान घातला आहे. जगात या जीवघेण्या कोरोनामुळे हजारो नागरिक मृत्यूमुखी पडले असून लाखों नागरिकांना याची बाधा झाली आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने त्याचे संक्रमण गुणाकाऱ्याच्या पटीत वाढत आहे. याच पार्श्‍वभूमीवर राज्यशासनाने सात वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील कैद्यांना पॅरोल किंवा जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे

 त्याचाच एक भाग म्हणून नांदेड कारागृहातील अशा १५ जणांना न्यायालयाने जामीन दिला आहे. सध्या नांदेड कारागृहात १६५ कच्चे कैदी स्थानबध्द आहेत. त्यांच्या आरोग्याकडे कारागृह प्रशासन विशेष लक्ष ठेवत असल्याचे कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले. 

कोरोना या महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यशासन व देशभरातील प्रशासन कठोर पाऊल उचलत आहे. सध्या देश ता. १४ एप्रीलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र अजूनही काही नागरिक या लॉकडाऊचे उल्लंघन करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. शासनाकडून जिवनावश्‍यक वस्तुचा तुटवडा होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतल्या जात आहे. त्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा -  सावधान : नांदेडकरांनो पोलिसांचे ऐका, कायद्याच्या कचाट्यात सापडू नका- दत्ताराम राठोड

नांदेड कारागृहात १६५ कच्चे कैदी स्थानबध्द

महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकताच कारागृहातील कैद्यांना सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्या निर्णयात सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या सर्वच कैद्यांना पॅरोल किंवा जामिन देण्यात येणार आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी होणार आहे. त्या पार्श्‍वूमीवर नांदेड कारागृहातील १५ कैद्यांना सोडण्यात आले आहे. विशेष या सर्व कैद्यांना न्यायालयाने जामिन दिला आहे. सध्या नांदेड कारागृहात १६५ कच्चे कैदी स्थानबध्द असून त्यांच्याशी बाहेरून आलेल्या नवीन न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा संपर्क येऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे.
 
प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकियांच्या सुचना

कारागृहातील सर्वच कैद्यांची नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून वेळोवेळी त्यांच्या हालचालीवर कारागृह प्रशासन लक्ष ठेवून आहे. कारागृहातील कैद्यांच्या आहाराबद्दल, आरोग्यबद्दल व तेथील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल काळजी घेण्याच्या सुचना कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीवक धोळकिया यांनी दिल्या आहेत. न्यायालयाच्या सुचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे श्री. चांदणे यांनी सांगितले.