कोरोना : मी तयार आहे तुम्ही तयार आहात ना?

शिवचरण वावळे
Saturday, 21 March 2020

रविवारी (ता.२२ मार्च २०२०) जागतीक कर्फ्यु दिन पाळला जाणार आहे. यासाठी नागरीकांना सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत स्वतःच स्वतःला बंद खोलीत कोंडुन घेत देशभक्ती दाखवावी लागणार आहे.

नांदेड : केंद्र व राज्य सरकारने जाहिर केल्याप्रमाणे देशभरात रविवारी (ता.२२ मार्च २०२०) जागतीक कर्फ्यु दिन पाळला जाणार आहे. यासाठी नागरीकांना सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत स्वतःच स्वतःला बंद खोलीत कोंडुन घेत देशभक्ती दाखवावी लागणार आहे. याची पूर्ण तयारी झाली असून, सोशल मीडियातूनही एक मेकांना संदेश पाठवून ‘मी तयार आहे, तुम्ही आहाता ना’? अशाप्रकारचे मेसेज एकमेकांना शेअर केले जात आहे.  

देशात कोरोनाचा संकट ओढवले असून, महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या पायरीवर येऊन पोहचला अहे.  कोरोनाने तीसरी पायरी चढु नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध माध्यमातून जनतेला सहकार्याचे आवाहन करत आहे. याची हळुहळु परिचिती येत असून, त्यांच्या आवाहनास नागरीक मोठ्या संख्येने प्रतिसाद देताना दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक स्वतःच ‘मी उद्या शंभर टक्के ‘जागतीक कर्फ्युदिन’ पाळणार आहे. तुम्ही सुद्धा कर्फ्युदिन पाळा.  चिन, इटलीने, जर्मनी, देशातील नागरीकांनी ज्या चुका केल्या त्या चुका आम्ही करणार नाही; कोरोनाला गंभीरतेने घ्या; इतर देशाच्या चुकापासून आपण काहीतरी शकले पाहिजे. घरात राहुन देशभक्ती दाखवा, घरात राहण्यासारखी दुसरी देशभक्ती असूच शकत नाही’, अशाप्रकारचे संदेश सोशल मीडियाद्वारे एक मेकांना पाठवून जनजागृती केली जात आहे. नागरीकांच्या या सतर्कतेमुळे शहरातील अनेक वर्दळीच्या ठिकाणची गर्दी कमी होताना दिसून येत आहे.

हेही वाचा- कोरोना व्हायरस : परभणीतील युनियन बॅंकेचे 10 कर्मचारी निगराणीखाली

असे असले तरी, काही नागरीक मात्र अद्यापही कोरोना विषयी गंभीरता पाळत नसल्याचे दिसून येत आहेत. रस्तयावरची गर्दी अजूनही म्हणावी तेवढी कमी झालेली नाही. शासकीय कर्मचारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडुन मौज मजा करताना दिसून येत आहे. या शिवाय कामगारांना देखील काम नसल्याने त्यांना सुद्धा घरात बसवत नाही. म्हणून शहरातील काही ठिकाणच्या चौकात, दुकानावर, रुग्णालयात एका रुग्णासोबत आठ ते दहा नातेवाईक येऊन शहरात गर्दी वाढवत आहे.   

पुणे - मुंबईहून नांदेड शहरात रोज शेकडो नागरीक दाखल होत आहेत. त्यांची आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर तपासणी केली जात आहे. त्यांच्यातील एखाद्या व्यक्तीस कोरोना संबंधीची काही लक्षणे आढळुन आल्यास त्या व्यक्तीस ताबडतोब रुग्णालयात दाखल करुन लक्षणे बघुन उपचार सुरु केले जात आहेत. यासाठी विशेष (वार्ड) बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.२० मार्च ) रोजी तीन व्यक्तीस संशयीत म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  नांदेड शहरात बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे इथे येणाऱ्या नागरीकांची पूर्ण तपासणी केली जात असली तरी, अनेकजन पुणे - मुंबईतून थेट स्पेशल गाडी करुन गावाकडे येत असून, स्वतःची तपाणी करुन घेण्याची त्यांची मानसिकता अजून तयार होताना दिसत नाही.

हेही वाचलेच पाहिजे-  कोरोना : पुण्याहून आलेले ते तीघे रुग्णालयात

त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या नागरीकांपासून नांदेडकरांनी सावधान राहिले पाहिजे. आपल्या शेजारी कुणी पुणे - मुंबईहून किंवा इतर देशातून आले असेल तर अशा नागरीकांबद्दलची माहिती पोलीस किंवा आरोग्य विभागाच्या -जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. एन. आय.भोसीकर ९८९०१३०४६५, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे ९९७००५४४०, पोलिस विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर ०२४६२-२३४७२०, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर ९६८९६०९९९९ व अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक नांदेड दत्‍तराम राठोड ७७७४०७७१०० यांच्या भ्रमणध्‍वनीवर संपर्क साधून माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: I'm Ready Are You Ready Nanded News