कोरोना व्हायरस : परभणीतील युनियन बॅंकेचे 10 कर्मचारी निगराणीखाली 

गणेश पांडे
शनिवार, 21 मार्च 2020

कोरोना व्हायरस : परभणीतील युनियन बॅंकेचे 10 कर्मचारी
निगराणीखाली 

 

परभणी : शहरातील युनियन बॅंकेच्या 10 कर्मचाऱ्यांरी कोरोना संशयीताच्या संपर्कात आल्याची बाब उघड झाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॉब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ता. 31 मार्च पर्यत युनियन बॅंकेची परभणी येथील शाखा बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (ता.21) सकाळशी बोलतांना दिली.

परभणी शहरात कोरोनो प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. जिल्ह्यात शुक्रवार पर्यत 44 रुग्णांची नोंद झाली आहे. 31 स्वॉब घेतले असून त्यापैकी 16 निगेटीव्ह असून 7 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 8 स्वॉब रिजेक्ट करण्यात आले आहेत. त्यात एक खळबळ उडून देणारी घटना समोर आली आहे. येथील युनियन बॅंकेच्या व्यवस्थापकाचा मित्र काही दिवसापूर्वी दुबई देशातून भारतात आला होता. तो मित्र व सदर व्यवस्थापक काही कालावधीसाठी एकमेकांच्या संपर्कात आले होते. 

हेही वाचावाटा करिअरच्या : दहावीनंतर पुढे काय?

बॅंकेतील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ 

त्यानंतर सदर व्यवस्थापक ही बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहिले. परंतू दुबईहून परतलेला तो मित्र कोरोना संशयीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे बॅंकेतील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या बॅंकेतील सर्व 10 कर्मचाऱ्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयातील अलगीकरण कक्षात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या 10 कर्मचाऱ्यांचे स्वॉब तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे यांच्याकडे तपासणी साठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सकाळशी बोलतांना दिली.

31 मार्च पर्यत बॅंकेची शाखा बंदच

कोरोना संशयीताच्या संपर्कात आलेल्या युनियन बॅंकेच्या 10 कर्मचाऱ्या पैकी दोन कर्मचारी हे नांदेडहून ये  - जा करत होते. तर उर्वरित 8 जन हे परभणी येथे वास्तव्यास होते. परंतू खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच ही बॅंक ता. 31 मार्च पर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

येथे क्लिक करा - कोरोना : मराठवाडयातील सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना

जिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोबस्त

जिल्हा रुग्णालयातील तयार करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षातून कोणताही रुग्ण बाहेर पडू नये किंवा पळून जाऊ नये यासाठी या कक्षाच्या बाहेर पोलिसांचे सुरक्षितता देण्यात आली आहे. गंगाखेडचा एक रुग्ण पळून गेला होता. त्याला त्याच्या गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Section news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus10 employees of Union Bank in Parbhani Under surveillance