
सेलू ( जिल्हा परभणी ) : देशासह राज्यात मार्च २०२० पासून कोरोना संसर्गजन्य रोगाने (Corona virus) चांगलेच थैमान घातले. त्यामुळे राज्यात अनेकवेळा लाॅकडाऊन सारखे पर्याय अवलंबवावी लागले. पर्यायाने शाळा, महाविद्यालये बंद (school, college closed) ठेवण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्यच अंधकारमय झाल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Corona makes children's futures dark; Anxiety in parents)
कोरोना संसर्गजन्य रोगाने देशभरासह राज्यातील लाखों नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अनेकांची संसारे उदस्थ झाली आहेत. राज्यशासन कोरोना संसर्गजन्य रोग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करित आहे. राज्यभरातील सर्व शाळा, महाविद्यालये राज्यशासनाला बंद ठेवावी लागली. पर्यायाने शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आॅनलाईन सारखे पर्याय निवडवावे लागले. परंतु जे शिक्षण शाळा,महाविद्यालयाच्या वर्गातील गुरुजी, प्राध्यापकांकडुन मिळते ते शिक्षण आॅनलाईन शिक्षणाला पर्याय कसा होवु शकतो. आॅनलाईन शिक्षण म्हणजे तात्पुरते शिक्षण होय.
हेही वाचा - गेल्या वर्षीही कोरोना व्हायरसमुळे यूपीएससीच्या वार्षिक वेळापत्रकात बदल करण्यात आला होता.
परंतु या कोरोनामुळे एक वर्षे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर झालेच येणारे वर्षेही कोरोनामुळे गेल्यावर्षासारखे आॅनलाईन शिक्षण झाले तर पालकांत भितीचे वातावरण पसरत आहे. आगोदरच आॅनलाईन शिक्षणासाठी पालकांनी आपल्या मुलांना आॅनराईड मोबाईल विकत घेवुन दिले. त्या सोबतच इंटरनेटचे बॅलेंसही भरले. मुलांना कधी नव्हे ते जगभरातल्या चांगल्या व वाईट बाबींची माहिती एका क्विकवर मिळत राहिली. याचाच फायदा सद्य: स्थितीत विद्यार्थी घेत आहेत. मोबाईलवर चांगल्या गोष्टी सोबतच वाईट गोष्टी पहात असल्याने पालकात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
राज्यशासनाने वाढत्या कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयाचे शिक्षण आॅनलाईन पध्दतीने चालु ठेवले. यामुळे खिशाला न परवडणारा मोबाईल पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घेवुन दिला. परंतू मोबाईलच पालकांची डोकेदुखी होवुन बसला आहे. या स्पर्धेच्या युगात आपले मुल मागे राहू नये या भाबड्या आशेपायी मुलांना दिलेला मोबाईल मुलांनी करमणुकीचे साधन केले आहे. प्रत्येक घरात मोबाईलचे ज्ञान पालकांपेक्षा मुलांनाच जास्त असल्यामुळे मुल आपल्या पालकांची फसवणुक करतांना दिसत आहेत.
- श्रीमती कल्पना हेलसकर, सह्याद्रीनगर, सेलू
माझी मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.परंतु या कोरोना मुळे तीचे क्लासेस आॅनलाईन होत असल्यामुळे मी तीला आॅनराॅईड मोबाईल घेवुन दिला.परंतु त्या मोबाईलचा उपयोग शिक्षणापेक्षा आपल्या मैत्रींना व्हाॅटशाॅपवर बोलण्यात घालत असल्यामुळे माझी मुलगी एकलकोंडी होत तर नाही ना अशी भिती वाटत आहे.
- अनिता शिंदे, गृहिणी, सेलू जि. परभणी.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.