उस्मानाबाद जिल्ह्यात १९४ जण कोरोना पॉझिटिव्ह, आठ रुग्णांचा मृत्यू

तानाजी जाधवर
Thursday, 24 September 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात २६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गुरुवारी (ता.२४) १९४ जणांना कोरोनाची लागण झाली असुन आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत आठ हजार २१ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.७९ टक्के एवढे झाले आहे, तर मृत्युदर तीन टक्के एवढा झाला आहे. जिल्ह्यामध्ये १९३ रुग्णसंख्या वाढली असुन त्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यामध्ये सर्वाधिक ५६ रुग्णांची नोंद झाली आहे.

औरंगाबादच्या कोविड केअरमध्ये गुटखा आणि दारूही, रुग्णांचे अजब शौक

सहा जण आरटीपीसीआरद्वारे व ४२ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत, तर आठ जण परजिल्ह्यामध्ये बाधित झाले आहेत. तुळजापुर १४ जण बाधित झाले असुन त्यापैकी तीन जण परजिल्ह्यामध्ये बाधित झाले. उमरगा २५ जण बाधित झाले असून १४ जण आरटीपीसीआरद्वारे व दहा जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. लोहारा तालुक्यात १५ जण बाधित आहेत. कळंब ३५ जणांना बाधा झाली असून आठ जण आरटीपीसीआरद्वारे, तर २७ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. वाशीमध्ये १२, भुम १५ जण बाधित आहेत. परंडा तालुक्यातील २२ रुग्णांची वाढ झाली आहे.

औशातील अवैध धंद्यांना अभय! तरुणाई झाली कंगाल, पालकमंत्री अमित देशमुख देणार का...

आठ जणांचा मृत्यू
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ८५ वर्षीय पुरुषाचा, वडगाव (सि) येथील ६५ वर्षीय पुरुष, येडशी येथील ७० वर्षीय पुरुष, कारी येथील ७२ वर्षीय पुरुष आदी चार जणांचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तुळजापुर खुर्द येथील ६८ वर्षीय स्त्रीचा खासगी रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. उमरगा शहरातील महादेव गल्ली येथील ६० वर्षीय स्त्रीचा उमरगा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला. भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील ८० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. तुळजापुर तालुक्यातील ७० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला. मागील काही दिवसांमध्ये बाहेर जिल्ह्यात झालेल्या चार जणांचे मृत्युची नोंद आज घेण्यात आलेली आहे. त्यामुळे मृताचा आकडा वाढुन ३३१ इतका झाला आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Positive 194 Cases Recorded In Osmanabad District