esakal | तुळजापुरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येची चिंता, तीर्थक्षेत्र धोकादायक वळणावर!

बोलून बातमी शोधा

Tuljapur Corona Updates}

शहरात रूग्णांची संख्या अशीच दिवसेंदिवस वाढत गेल्यास तुळजापूर तीर्थक्षेत्र धोकादायक वळणावर येऊ शकते. अनेक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.

तुळजापुरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येची चिंता, तीर्थक्षेत्र धोकादायक वळणावर!
sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील आणि शहरातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येबाबत मोठी चिंता वाढत आहे. प्रशासनाकडून भवितव्यात कोणती पावले उचलली जातात ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात शनिवारी (ता.२७) १९ कोरोना रूग्णांची भर पडली. त्यात शहरातील १३ रूग्णांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांचा वाढता आलेख लक्षात घेता प्रशासनाकडून उपाय योजना आवश्यक आहेत. गर्दी टाळण्याच्या कार्यक्रमावर फारशी उपाययोजना दिसून येत नाही.

वाचा - भयानक! दहा ते 12 रानडुकरांचा एकाच वेळी जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी तरुण आले धावून

शहरात रूग्णांची संख्या अशीच दिवसेंदिवस वाढत गेल्यास तुळजापूर तीर्थक्षेत्र धोकादायक वळणावर येऊ शकते. अनेक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गर्दी कमी करा हे प्रशासनाकडून सांगणे आणि त्याच्यावर उपाययोजना न होणे हे नित्याचेच ठरले आहे. तालुक्यात कोरोनाचा आकडा मागील १५ दिवसांपासूनचा ८० पर्यत गेलेला आहे. प्रशासनाकडून उपजिल्हा रुग्णालय तसेच तुळजाभवानी देवस्थान समितीची १२४ खोल्यांची धम॔शाळा ही कोविड केअर सेंटर म्हणून कार्यान्वित आहे. याच ठिकाणी रूग्ण ठेवले जात आहेत. सध्या दंडात्मक कारवाई करणे हा एकमेव कार्यक्रम प्रशासनाकडून चालू आहे. तथापि गर्दीवर नियंत्रण हे महत्त्वाचे आहे.

वाचा - पत्नी, दोन मुलांना मागे सोडून तरुण शेतकऱ्याने उचलले शेवटचे पाऊल; वडिलांच्या शेतातच!


मंदिरात गर्दी कमी
तुळजाभवानी मंदिरात गर्दीचे प्रमाण कमी करण्यात मात्र प्रशासनास यश आले आहे. तुळजाभवानी मंदिरात भाविक सोडतानाच गर्दी कमी केली जाते. गर्दी कमी केल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यास होण्यास मदत होणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर