कोरोना : अशोक चव्हाण यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा

Nanded Photo
Nanded Photo
Updated on

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता.१९) जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात बैठक घेतली. त्यानंतर श्री चव्हाण यांनी श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात जाऊन ‘कोरोना’ या जिवघेण्या आजाराच्या संशयीत रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण (आयसोलेशन) कक्षाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. बी. एम. शिंदे यांना योग्यत्या सुचना देऊन खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. 

जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण गुरुवारी नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी विविध विभागाचे आरोग्य अधिकारी व वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांची जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना या आजारा संदर्भात विविध आढावा बैठक घेऊन उपयुक्त सुचना दिल्या. बैठकीनंतर श्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या श्री गुरुगोविंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोना संदर्भात उभारण्यात आलेल्या वार्डची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार अमर राजुरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांची उपस्थिती होती. 

गाफील राहु नका खबरदारी घ्या-
एखादी व्यक्ती जेव्हा बाहेर देशातून येते तेव्हा त्या व्यक्तीस नेमके कुठे ठेवले जाते. त्यासाठी आयसोलेशन व कोरेंटाईन कक्ष कशा पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. त्या कक्षात नेमकी काय खबरदारी घेतली जात आहे. सर्दी, ताप, खोकला व ‘फ्ल्यु’ सारख्या आजारांच्या गोळ्या औषधांचा स्टॉक किती शिल्लक आहे. असलेल्या औषधींचा स्टॉक पुरेसा आहे का? कुठल्या शासकीय रुग्णालयात किती वार्ड तयार करण्यात आले आहेत. या शिवाय खासगी रुग्णालयाचे कशा पद्धतीने सहकार्य लाभत आहे. या बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयातील परिस्थिती पाहुन पालकमंत्री यांनी समाधान व्यक्त करताना कुणीही गाफील राहु नका अशा सूचना त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

सोशल मीडियाचा गैरवापर टाळा-
कोरोना आजाराबद्दल सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती आणि गैरसमज आहेत. परंतू या आजाराबद्दल भिती बाळगण्याचे कारण नसले तरी, सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र सध्या दुसऱ्या फेज मधुन जात असून, कोरोनासारख्या जिवघेण्या आजाराला परतवून लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. शासनाकडून करण्यात येत असलेल्या सर्व सुचनांचे योग्य ते पालन व्हावे. द्वेश भावनेतून कुणीही अफवा पसरवू नयेत. अशा सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केल्या. सोशल मीडियातून कुणीही अफवा पसरवु नयेत. जर कोणी अफवा पसरवत असेल तर संबंधीता विरोधात कारदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latur Usmanpura Fight Incident Parli Youth Dies Two Seriously Injured Police Probe Continues Into the Dispute
Paithan Godavari River Rescue Three Women Saved From Drowning by Two Young Men Who Showed Courage and Quick Thinking
Pune Beed Direct Railway Service Timetable Announced Train To Cover Journey In Seven Hours With Multiple Station Stops
Manoj Jarange Patil Hunger Strike Ends In Patoda Mumbai Protest Put On Hold Government Gets Three Months For Maratha Demands
Marathi News Esakal
www.esakal.com