
हिंगोली : कोरोना विषाणुजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मंगळवारी (ता.२४) जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्यावर पोलिसांची गस्त सुरू असून संपूर्ण शहरात पोलिसांचा फौजफाटा दिसत आहे. रस्त्यावर कोणी दिसणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे पोलिस सतत माहिती देत आहेत.
हिंगोली शहरात १८ ते २३ मार्च दरम्यान सामान्य रुग्णालयात तीन स्क्रिनिंग करण्यात आले. जिल्ह्यात १६० आयसोलेशन; तर ४०० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या एकही रुग्ण सामान्य रुग्णालयात दाखल नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना संशयितांची तपासणी करण्याची सुविधा करण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास ५०० बेडची व्यवस्था अलगीकरण आणि विलगीकरणासाठी करण्यात आली आहे.
स्वतःहून आरोग्य तपासणी केली
यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामधील पाच शासकीय इमारती ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात पुणे, मुंबई येथून आलेल्या दोनशे ते तीनशे जणांनी स्वतःहून खबरदारी म्हणून आरोग्य तपासणी केली आहे. त्यापैकी एकालाही कोणताच आजार नसल्याचे डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले. जिल्हाप्रशासन सर्वच बाबतीत काळजी घेत असून बाजारपेठ बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता मंगळवारी सर्व बाजारपेठ बंद होती. त्यामुळे बाजारपेठेत सन्नाटा पसरल्याचे पहावयास मिळाले.
औंढा नागनाथ कडकडीत बंद
औंढा नागनाथ : ः शहरासह तालुक्यातील खासगी वाहतूक बंद आहे. काही जणांनी शहरात येण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस कर्मचारी त्यांना सूचना देत घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले. कोरोनाची जनजागृती मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येत आहे. ग्रामीण भागातही तहसीलचे पथक, पोलिस व आरोग्य पथके फिरत असल्यामुळे त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील बाजारपेठ बंद असल्याचे मंगळवारी पहावयास मिळाले.
सेनगाव संचारबंदीचे होतेय उल्लघंन
सेनगाव : शहरातील मुख्य रस्त्यावर पोलिसांची गस्त सुरू आहे. मात्र, कोणतीही कारणे सांगत दुचाकी वाहनावरून नागरिक फिरू लागले आहेत. येथील प्रभाग सहा मधील नागरिकांनी वाहने ये-जा रोखण्यासाठी चक्क रस्ते बंद केले आहेत. सोमवार (ता.२३) पर्यंत एक हजार २१२ स्थलांतरित नागरिक तालुक्यात दाखल झाल्याची नोंद आहे. प्रशासन या आजाराबाबत अलर्ट झाले आहे. दरम्यान मंगळवारपासून पोलिसांकडून मुख्य रस्त्यावर गस्त घालण्याचे काम केले जात आहे.
ठिकठिकाणी रस्ते केले बंद
काही नागरिक मेडिकल व अत्यावश्यक सुविधेच्या नावावर दुचाकी वाहनावर भटकंती करत आहेत. शिवाजी चौक ते आप्पास्वामी प्रवेशद्वार व आजेगाव रोड ते तहसील कार्यालय परिसर या रस्त्यावरील वाहतूक पूर्णता बंद राहण्यासाठी पोलिस प्रशासन परिश्रम घेत आहे. प्रभाग सहामध्ये ये-जा करणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या भागातील काही तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन ठिकठिकाणी रस्ते बंद केले आहेत. रस्ते बंद करताच वाहनचालकांची चांगलीच कोंडी झाली.
येथे क्लिक करा- कोरोना : संशयितावर ‘व्हीआरआरटी’ पथक ठेवणार लक्ष
पेट्रोल पंपावर होतेय गर्दी
सोमवारी जिल्हाभरातील पेट्रोल पंपावर अनेकांनी मोठी गर्दी केली. हिंगोलीसह, कळमनुरी, वसमत, सेनगाव, पुसेगाव, औंढा, वारंगाफाटा, आखाडा बाळापूर आदी पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचे दिसून आले. जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने काही पेट्रोल पंपावर पोलिसांनी येऊन गर्दी कमी करण्यास मोलाची भूमीका बजावली. तर काही वाहनधारक पोलिस आल्याचे लक्षात येताच परत गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.