Corona Update: २४ तासांत बीडमध्ये १८० नवे रुग्ण

गुरुवारी आरटीपीसीआर टेस्ट‍मध्ये १८० रुग्ण बाधीत असल्‍याचे अहवालात नमुद आहे
corona update
corona updatecorona update

बीड: Beed Covid 19 Updates: जिल्ह्यात शुक्रवारी (दि.३०) आणखी चार जणांचा कोरोनामुळे बळी गेला. तसेच १८० नवे रुग्ण आढळले तर १४१ कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात गुरूवारी ५ हजार ३७९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्‍यातील ५ हजार १९९ अहवाल निगेटिव्ह आले तर १८० जण बाधित आढळले. आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्‍यामुळे या तीन तालुक्यांवर आरोग्य प्रशासन विशेष लक्ष ठेऊन आहे.

गुरुवारी आरटीपीसीआर टेस्ट‍मध्ये १८० रुग्ण बाधीत असल्‍याचे अहवालात नमुद आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ४३, अंबाजोगाईतील २, बीड ३६, धारूर १३, गेवराई १८, केज १४, माजलगाव ५, परळी २, पाटोदा १८, शिरूर २२, वडवणी ७ येथील रुग्णांचा समावेश आहे. तसेच चार मृत्यूही झाले. आता एकूण बाधितांची संख्या ९७ हजार १०४ झाली आहे. पैकी ९२ हजार ८५७ कोरोनामुक्त झाले असून २ हजार ६०७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ६४० रुग्ण उपचार घेत आहेत.

corona update
वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे हिंगोलीत तरूण विवाहितेचा गेला जीव

लस उपलब्धतेचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्‍न-
बीड जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते हे ग्राह्य धरुन जिल्‍हा आरोग्य प्रशासन कामाला लागले आहे. जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, औषधे, इंजेक्शन्स, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता व सुसज्जता ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्याची क्षमता प्रतिदिन १ लाख लसीकरणाची असून राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यात लस उपलब्धतेचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्‍न केले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com