esakal | उमरग्यात सोळा दिवसांत २१ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

umarga corona conditions

उमरग्यात सोळा दिवसांत २१ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उमरगा (उस्मानाबाद): कोरोना संसर्गाचा घाला अनेक निष्पाप लोकावर बसत आहे. एप्रिल महिन्यात पंधरा दिवसांत रुग्णसंख्या सहाशेपार झाली असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थिती भयावह असून संचारबंदीत नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घरीच रहाणे संयूक्तिक राहणार आहे. दरम्यान गतवर्षीपासून शुक्रवारपर्यंत ९२ लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यात एप्रिल महिन्यात २१ जणांचा समावेश आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची पालिकेच्या पाच कर्मचाऱ्यावर असून धोका पत्करत पाच पांडव प्रजेची हलाखी स्थिती समजून काम करताहेत. मात्र त्यांच्या आर्थिक हलाखीची संवेदना प्रशासन व समाजमनाने ओळखायला हव्या.

कोरोना संसर्गाच्या वेगात अनेकांना संसर्ग होतो आहे. एप्रिल महिन्यात तर बाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्ती जवळ नातेवाईकही जाईनात. मात्र धोका पत्करत पालिकेचे कर्मचारी मृतांवर अंत्यसंस्कार करताहेत. मृत व्यक्तिचा अहवाल पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर मुकादम परमेश्वर सौंदरगे, कर्मचारी संतोष कांबळे,  शाहूराज कांबळे, सदाशिव जाधव, राजू देडे, शववाहिका चालक निखील मोरे अंत्यसंस्काराची तयारी करतात. रुग्णालयातुन प्रेत उचलण्यापासुन ते वहानातुन स्मशानभूमीत नेऊन तेथे सरण रचणे आणि प्रेतावर अंत्यसंस्काराचे काम कर्मचाऱ्याना करावे लागते. अनेक मयताच्या नातेवाईकांची इच्छा विधीवत अंत्यसंस्कार करण्याची असते तेंव्हा कर्मचाऱ्यावर ताण येतो ; तरीही नातेवाईकाचा आग्रह पूर्ण करण्याचा प्रयत्न कर्मचारी करतात.

हेही वाचा: काय सांगता! पाट्या बदलून अचानक दुकाने झाली अत्यावश्यक

नाते दूरावले ; ऑनलाईन अंत्यदर्शन-

कोरोनामुळे नाती तर दुरावलीच पण अंत्यदर्शनही घेता येईना. स्मशानभूमीत मोजकेच नातेवाईक लांबूनच अंत्यदर्शन घेतानाचे चित्र दिसून येत आहे. नातेवाईकांच्या हृदयाला पाझर फुटतो पण ऐनवेळी मन कठोर करावे लागत आहे. जवळच्या नातेवाईकांना अंत्यदर्शन शक्य होत नसल्याने इतर नातेवाईक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अंतिम दर्शन घडवून आणत आहेत.

दरम्यान दोन दिवसापुर्वी अपवाद वळगता लिंगायत व मुस्लीम समाजातील दोन व्यक्तींच्या मृतदेहाचे दहन करण्याच्या प्रकारचा अपवाद वळगता ज्या त्या धर्माच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.१६) उमरगा शहरातील आरोग्यनगरीतील ६७ वर्षीय नाईचाकुर, सरवडी (ता.निलंगा) व आळंगा (ता.आळंद ), मलंग प्लॉट उमरगा, व कोरेगाव येथील असे सहा जण पॉझिटिव्ह आले.

" वर्षभरापासून कर्तव्य म्हणून बाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचे काम आम्ही पाच कर्मचारी करत आहोत. हे सर्व करत असताना आम्हाला परिवाराची चिंता असते. घरी गेल्यावर दोन वेळा आंघोळ करावी लागते. अनेक वेळा तर उंबरठ्याच्या बाहेर बसून जेवण करावे लागते. बिकट परिस्थितीची जाणीव ठेवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे.  - निखील मोरे, कर्मचारी