
उर्वरीत विद्यार्थ्यांना शाळेतच क्वारंटाईन करण्य़ात आले आहे. या वसतिगहाला मेस आहे. तेथील सर्वच कर्मचाऱयांच्या तसेच शिक्षकांच्या देखील तपासणी करण्यात आल्या आहेत
लातूर: गेल्या काही दिवसापासून शहर व जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यात सोमवारी (ता. २२) रात्री सर्वांनाच धक्का बसला. येथील एमआयडीसीतील एका वसतिगृहात ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यातील बहुतांश विद्यार्थी हे आदिवासी भागातील आहेत. शिक्षणासाठी ते येथे राहिले आहेत. या वसतिगृहातील इतर ३२० विद्यार्थ्यांवर आता महापालिकेचे प्रशासन लक्ष ठेवून आहे. हे वसतिगृह महापालिकेने सील केले आहे.
येथील एमआयडीसी भागात एक सीबीएससी स्कूल आहे. यात औरंगाबाद, कळमनुरी, पांढरकवडा आदी भागातील आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी राहत आहेत. यात सोमवारी एका विद्यार्थ्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. तो विद्यार्थी पॉझिटीव्ह आला. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाने या वसतिगृहात आरोग्य पथक पाठवून सर्वच विद्यार्थ्यांची टेस्ट घेतली.
Corona Updates: धक्कादायक! एकाच वसतीगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा
यात ४० विद्यार्थी पॉझिटीव्ह आले आहेत. तातडीने या विद्यार्थ्याना बारा नंबर पाटी येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांना शाळेतच क्वारंटाईन करण्य़ात आले आहे. या वसतिगहाला मेस आहे. तेथील सर्वच कर्मचाऱयांच्या तसेच शिक्षकांच्या देखील तपासणी करण्यात आल्या आहेत. पण त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे पहिल्या तपासणीत दिसून आले आहे.
एमआयडीसीतील सीबीएससी स्कूलमध्ये असलेल्या वसतिगृहातील ४० विद्यार्थी पॉझिटीव्ह आले आहेत. तेथील सर्वच विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. चार पाच दिवसानंतर पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. पॉझिटीव्ह आलेल्या विद्यार्थ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्य़ात आले आहे. हे औरंगाबाद, कळमनुरी, पांढरकवडा आदी भागातील आदिवासी विद्यार्थी आहेत. शिक्षणासाठी ते येथे आले आहेत. सर्वांची प्रकृती चांगली आहे. शहरात अनेक वसतिगृह आहेत. त्यांची तपासणी मोहिम हाती घेण्य़ात आली आहे- शशिमोहन नंदा, उपायुक्त, महापालिका.
(edited by- pramod sarawale)