Corona Vaccination: कळंबमध्ये लसीकरणासाठी केंद्रांवर प्रचंड गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kalamb

Corona Vaccination: कळंबमध्ये लसीकरणासाठी केंद्रांवर प्रचंड गर्दी

कळंब (उस्मानाबाद): जिल्ह्यामध्ये १२ मे आणि १३ मे रोजी ११ लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने पाहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी केली असल्याचे चित्र दिसून आले आहे. कळंबमध्येही लसीकरणासाठी केद्रांवर नागरिक मोठी गर्दी करताना दिसत आहेत. नियोजनाअभावी लसीकरण केंद्रेच सुपरस्प्रेडर बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ज्या लाभार्थ्यांचा कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन किमान २८ दिवस पूर्ण झालेले आहेत आशा लाभार्थ्यांना कळंबमध्ये नेमून दिलेल्या लसीकरण केंद्रांवर दुसरा डोस दिला जाणार आहेत. यामूळे नागरिकांनी पहाटे चार वाजताच रांगेत आपापला क्रमांक लावला होता. डोस देण्याची प्रक्रिया ही सकाळी नऊ वाजता सुरू होणार असतानाही पहाटेपासून लावलेल्या रांगेत जशी-जशी सकाळ होत होती तशी पुरुषांच्या व महिलांच्या स्वतंत्र रांगा ह्या अधिकच मोठ्या होत गेल्या आहेत.

हेही वाचा: चांगली बातमी! औरंगाबादेत नवीन रुग्णांपेक्षा कोरोमुक्तांची संख्या जास्त

या दुसऱ्या डोससाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन बुकींग करण्याची आवश्यकता नसल्यामुळे लाभार्थ्यांना रांगा लावून डोस साठी प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन ऑनस्पाॅट पद्धतीने त्यांचे व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर लस देण्याबाबत कार्यवाही होणार असल्याने नागरिकांची धांदल उडाली होती.

हेही वाचा: International Nurses Day 2021: लढतो आहोत, मरेपर्यंत राबवू नका

लसीकरणाला जातेवेळी नागरिकांनी आधार कार्ड आणि पहिला डोस घेतला त्यावेळेसचे नोंदवलेले ओळखपत्र, तसेच प्रमाणपत्र अथवा मोबाईलवर प्राप्त झालेला मेसेज लसीकरण केंद्रांवर प्रक्रिया सुलभ होणे करिता सोबत बाळगावे असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले होते. या लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार नसल्याने काही नवीन लाभार्थी रांगेत उभे राहिले होते. डोस मिळणार नसल्याचे समजताच ते रांगेतून निघून गेले. तरीही कळंबमध्ये लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे.

Web Title: Corona Vaccination In Kalamb Osmanabad Latest News Covid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Osmanabadvaccination
go to top