
International Nurses Day 2021: लढतो आहोत, मरेपर्यंत राबवू नका
कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्ण (Covid Infected) उपचाराला रुग्णालयात आला की, डॉक्टर त्याला तपासतात, औषधे देतात, परिचारिकांना (Nurses) उपचाराचे सांगून जातात, तिथून पुढे रुग्ण बरा होईपर्यंत त्याला औषध देण्यापासून सुश्रूषा करण्यात परिचारिका उभ्या असतात. खासगी असो वा शासकीय रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचारात परिचारिकांचे योगदान मोठे आहे.
international nurses day special story by shivaji yadav kolhapur
जिल्हाभरात खासगी व शासकीय रुग्णालयात जवळपास अडीच हजारांवर परिचारिका वर्षभर अखंडपणे सेवा बजावतात. शासकीय परिचारिकांना वाढीव रजा हवी, तर खासगी परिचारिकांना किमान वेतन, भत्ते हवे आहेत. आम्ही लढतो आहोत; पण मृत्यू येईपर्यंत राबवू नका, अशी मागणी त्या करत आहेत. वर्षापासून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढता आहे. शासकीय, खासगी रुग्णालयात हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी आले. त्यांच्यावर अव्याहतपणे उपचार सेवा देण्यात परिचारिका पुढे आहेत. शासकीय परिचारिकांना शासकीय नियमानुसार वेतन मिळते.
किमान २५ ते ६० हजारांपर्यंतचे वेतन व शासकीय भत्ते आहेत. तर खासगी रुग्णालयाच्या क्षमतेप्रमाणे वेतन देण्यात येते. येथे १० ते ३० हजारांपर्यंत वेतन आहे. मात्र, अन्य सुरक्षा नाहीत. दोन्ही ठिकाणच्या परिचारिका सतत कोरोना रुग्णांच्या संपर्कात असल्याने परिचारिकांनाही कोरोना होण्याचे प्रमाण मोठे आहे. घरात मूल, वृद्ध आईवडील, सासू, सासरे आदींच्या संपर्कात त्यांना रोज जावे लागते. अनेक परिचारिकांच्या घरातील अन्य व्यक्तीही बाधित झाल्या आहेत.
वास्तविक कोरोना ड्यूटी बजावणाऱ्या परिचारिकांना स्वॅब तपासणीनंतर सात दिवसांची पूर्वी विश्रांतीची रजा होती. नंतर ती तीन दिवस केली. तीन महिन्यांत तीन दिवसांची रजाही बंद केली आहे. याशिवाय काही परिचारिका कोरोनाबाधित झाल्यास त्यांना बरे होण्यासाठी जास्त दिवस लागले, तर बिनपगारी रजा घ्यावी लागते. कोरोना बरा होईपर्यंतच्या सात दिवसांची रजा शासनाने द्यावी, अशी शासकीय परिचारिकांची मागणी आहे, तर खासगीत काही वेळा रजेची वेतन कपात केली जाते.
हेही वाचा- Good News: शिराळाच्या आयसेरा बायोलॉजिकल कंपनीचा दावा! कोरोना होणार आता छु मंतर
खासगी परिचारिकांच्या मागण्या अशा ः
परिचारिकांच्या प्रश्नांसाठी नर्सिंग संचनालय व्हावे
आरोग्य सेवेतील खासगीकरण, कंत्राटीकरण पद्धत बंद करावी
आरोग्य कर्मचाऱ्यांवरील मेस्मा कायदा रद्द करावा
भरती प्रक्रिया सरळ सेवेनुसार राबवावी
कोरोना काळात सेवा बजावलेल्या खासगी परिचारिकांचा सन्मान करावा
‘‘डॉक्टर्स ऑर्डर देतात; पण परिचारिका नातेवाईकांपासून दूर असलेल्या रुग्णाला धीर देत त्याला सेवा देतात. खऱ्या फ्रंटलाईन वॉरियर परिचारिका आहेत. त्या जनतेचे संरक्षण करत आहेत, हा आमचा गौरव आहे. सर्व पातळीवर परिचारिकांचे योगदान विचारात घ्यावे.
- हशमत हावरी, राज्य उपाध्यक्ष, शासकीय नर्सिंग असोसिएशन.
जिल्ह्यात..
०शासकीय परिचारिका -- १५००
० खासगी परिचारिका--- १२००
Web Title: International Nurses Day 2021 Special Story By Shivaji Yadav
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..