esakal | कोरोना : गावच्या वेशितच ग्रामसुरक्षादलाचा पहारा
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

ग्रामरक्षक दलातील कोणत्याही सदस्यांनी कोणत्याही नागरिकास गैरवर्तन व मारहाण करू नये. नियमबाह्य पद्धतीने गावामध्ये प्रवेश केलेल्या जिल्ह्या बाहेरून आलेल्या व्यक्तीची स्वतंत्र व्यवस्था गावातील शाळेत, गावच्या सभागृहात करण्यात यावी. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना, व्यक्तींना प्रतिबंध करू नये, त्यांची नोंद नोंदवहीमध्ये आवश्यक  आहे. 

कोरोना : गावच्या वेशितच ग्रामसुरक्षादलाचा पहारा

sakal_logo
By
नवनाथ येवले

नांदेड : कोरोना विषाणूचे संकट म्हणजे गावाच्या सेवेसाठी मिळालेली एक संधी आहे. त्यामुळे गावातील  शांतता, सलोखा कायम राखत कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंधात्मक ग्रामदक्षता दल स्थापन करण्यात आले आहेत.  खबरदारी घ्या, दक्ष राहा आपल्या सतर्कतेमुळे कोरोनाचा शिरकाव रोखू शकतो, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र) डाॅ. शरद कुलकर्णी यांनी केले  आहे. 

कोरोनाचे  संक्रमण  रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना, संचारबंदी, जमाबंदी तसेच जिल्हाबंदी आदेश लागू केले आहेत.  कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपण आता निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. यापुढे काही दिवस आपल्यासाठी आव्हानात्मक असून आपण सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपायोजना आणखी कडक करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कोरोना विषाणूला आत्तापर्यंत गावापासून दूर ठेवण्यात यश आले आहे. 

हेही वाचा - Coronavirus - चीनचा कट्टर विरोधक तैवानने कोरोनालाही हरविले...वाचून थक्क व्हाल

दोन शिप्टमध्ये चालते काम 
नांदेड जिल्ह्याला इतर राज्यांसह काही जिल्ह्याच्या सीमा लागून असून वेगवेगळ्या दिशेने येणारे अनेक रस्ते आहेत. त्यामुळे अशा रस्त्यावर लक्ष ठेवून जिल्हा बाहेरील कोणीही नागरिक गावात प्रवेश करणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील सुजान, सतर्क अशा दोन-तीन युवकांचा समावेश करून कोरोना प्रतिबंधात्मक ग्रामरक्षकदल स्थापन केले आहे. आवश्यकतेप्रमाणे पथकांची संख्या ठरवून गावात बाहेरून येणारे सर्व रस्ते गाडीमार्ग, पायवाटांवर चेक पोस्ट तयार करून ग्रामसुरक्षा दल दोन शिप्टमध्ये काम करत आहे.  

अत्यावशय्क गरजांचा पुरवठा घरीच करावा
गावातील जे नागरिक कामानिमित्त बाहेरगावी विशेषतः पुणे-मुंबई, औरंगाबादसह तेलंगणा, कर्नाटक व इतर ठिकाणी असलेल्यांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात प्रवेश बंदी असल्याचे फोनवरून त्यांना अवगत करावे. गावात शंभर टक्के संचारबंदीचे व जमावबंदीचे पालन करावे.

हे देखील वाचाच - सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील

हे करत असताना गावातील वृद्ध, गरोदर स्त्रिया, बालके, विविध आजाराने पीडित लोकांची काळजी घ्यावी.  त्यांना घराबाहेर पडू न देता त्यांच्या आवश्यक गरजांचा पुरवठा घरीच होईल याची दक्षता घ्यावी. याप्रसंगी कोणाविषयी कुठलाही द्वेष- सूडबुद्दी मनात न ठेवता काम करावे असे आवाहनही प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. कुलकर्णी  यांनी केले आहे.