esakal | सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

रात वृद्ध, मध्यमवयीन आणि लहान मुले असा तीन पिढ्यांचा सहवास सक्तीचा झाला आहे. सारखे घरातच असल्याने मानसिक ताणतणाव येतोच, तेव्हा सकारात्मक विचार ठेवला पाहिजे, असा सल्ला मानसशास्त्रज्ञ डॉ. सुजाता देवरे यांनी दिला आहे. 

सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

sakal_logo
By
सुहास सदाव्रते

जालना -  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे संचारबंदी लागू आहे. घरात वृद्ध, मध्यमवयीन आणि लहान मुले असा तीन पिढ्यांचा सहवास सक्तीचा झाला आहे. सारखे घरातच असल्याने मानसिक ताणतणाव येतोच, तेव्हा सकारात्मक विचार ठेवला पाहिजे, असा सल्ला मानसशास्त्रज्ञ डॉ. सुजाता देवरे यांनी दिला आहे. 

कोरोना व्हायरस घटनेच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने घराबाहेर पडता येत नाही, असा सर्वसाधारण व्यक्तींचा अनुभव व प्रतिक्रिया आहे. सारखे घरात बसून बसून वृद्धांसह लहान मुलेही त्रस्त झाल्याचे चित्र घरोघरी पाहायला मिळते आहे. तीन पिढ्यांचा सक्तीचा सहवास असल्याने घरात ताणतणावाचे वातावरण निर्माण होणे साहजिकच आहे. वृद्धांचे प्रश्न निराळे, तर लहान मुलांचे विश्व भिन्न स्वरूपाचे आहे. अशा घरातील वातावरणात मात्र मध्यमवयीन पालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.

हेही वाचा : पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री

सध्याच्या परिस्थितीत टीव्हीसह इतर सोशल मीडियावर कोरोना विषाणूबाबत जनजागृती केली जात आहे. एकाच गोष्टीचा जर सारखा विचार केला जात असेल तर मानसिकता नकारार्थी बनत असते, असे मानसशास्त्र विषय अभ्यासकांचे म्हणणे आहे. घरात वृद्ध व्यक्ती आणि घरातील लहान मुले ही दोन टोके आहेत, विचारांत भिन्नता असते, तेव्हा वादविवाद होतात. तसे लहान मुलांनी हे करू नये, ते करू नये असा सारखा सल्ला वृद्ध व्यक्ती देतात तेव्हा लहान मुलांना मुक्त वातावरण हवे असते. यामुळे तणाव निर्माण होतात. घराबाहेर जायचे नाही आणि घरातही शांतच बसायचे? अशा विचाराने लहान मुले संभ्रमित होत असल्याचे संतोष राठी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :  लॉकडाऊनमध्ये मजुरांच्या हाताला मिळणार काम

सारखे टीव्ही पाहणे व तेच ते कार्यक्रम किंवा कोरोनाविषयी प्रसारित होत असलेल्या सततच्या बातमीमध्ये सारखे गुंतत गेल्याने नकारार्थी विचार येतात, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. घरात सतत कामात असल्याने महिलावर्गाला अधिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. अशा वेळी कौटुंबिक वातावरण हसतखेळत कसे होईल याकडे घरातील इतर सदस्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते, असेही मानसशास्त्रज्ञ टिप्स देताना सांगतात. 


हे करावे... 

• सुसंवाद साधावा 
• सकारात्मक विचार ठेवा 
• व्यायाम, योगा-प्राणायाम करावा 
• आहार संतुलित ठेवावा 
• वास्तवाचा विचार करावा 
• भविष्यकाळाचे नियोजन करावे 
• मनःशक्तीसाठी : वाचन करावे, छंद जोपासावा, संगीत ऐकणे, लेखन करावे, सुसंवाद साधावा 
• मानसिक क्षमता ओळखाव्यात 

हे टाळावे... 

• एकसारखा तोच तो विचार करू नये 
• अवास्तव विचार टाळावा 
• नैराश्य, चिंता टाळावी 
• नकारार्थी विचार टाळावेत 
• सोशल मीडियावरील फेक मजकूर टाळावा 
• अतिताण येईल असा विचार करू नये 
• शिळे अन्न खाऊ नये, प्रतिकारशक्ती कमी होते

सध्या सक्तीची सुटी आहे. घरात वृद्धांसह मध्यमवयीन व लहान मुले असा तीन पिढ्यांचा सहवास आहे. सारखे घरातच असल्याने लहान मुले व वृद्ध यांची मानसिक कोंडी होत आहे. महिला, मुलींच्या समस्याही वेगळ्या आहेत. अशा वातावरणात दडपण न घेता सकारात्मक विचार ठेवले पाहिजे. 
- डॉ. सुजाता देवरे, 
मानसशास्त्रज्ञ, जालना