कोरोना व्हायरस : रक्तदात्यांमध्ये भितीचे वातावरण

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 18 मार्च 2020

कोरोना व्हायरस : रक्तदात्यांमध्ये भितीचे वातावरण

नांदेड  : कोरोना या जीवघेण्या आजाराच्या भितीमुळे रक्तदात्यांनी रक्तादन शिबीराकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा सुरू झाला निर्माण झाला आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास घाबरु नये. रक्तदान केल्यामुळे कोरोना आजार होण्याचा कुठल्याही प्रकारचा धोका नसतो असे महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे. 

नांदेड  : कोरोना या जीवघेण्या आजाराच्या भितीमुळे रक्तदात्यांनी रक्तादन शिबीराकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा सुरू झाला निर्माण झाला आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास घाबरु नये. रक्तदान केल्यामुळे कोरोना आजार होण्याचा कुठल्याही प्रकारचा धोका नसतो असे महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे. 

सध्या covid 19 कोरोना विषाणुची साथ सुरू आहे. शासनाकडून जनसामान्यामध्ये याबाबत जागृती करुन या आजारावर प्रतिबंध व नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रतिंबधक उपाययोजनेचा भाग म्हणून जनतेला गरज नसेल त्यावेळेस गर्दीच्या ठिकाणी जावु नये, मोठ्या प्रमाणात मेळावे घेउ नये अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी एप्रील व मेमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे तसेच नियमीत रक्तदाते बाहेरगावी गेल्यामुळे रक्ताचा राज्यात तुटवडा भासतो. 

राज्य रक्त संक्रमण परिषदेने सुचना जारी केल्या 

राज्यात दर दिवशी साधारपणे साडेचार हजार ते पाच हजार रुग्णांना गंभीर आजाराच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी, अपघातग्रस्तांसाठी व थॅलेसेमीया आणि हिमोफिलीया या रक्ताच्या आजारग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासते. ही बाब लक्षात घेता रक्तादात्यांनी कोरोना विषाणुबाबतची लक्षणे व प्रवासाचा पूर्व इतिहास तपासून व सुरक्षा, स्वच्छतेचे पालन करुन तेसेच रक्तदानाच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थित नियमन करुन रक्तदान शिबिरे आयोजीत करण्याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेने सुचना जारी केल्या आहेत.

हेही वाचाVideo: शासकीय कार्यालयाचे दरवाजे बंद

सद्यस्थितीत रक्तास कुठलाही पर्याय उपलब्ध नाही

रक्तदात्यांमध्ये रक्तदान करण्याविषयी भिती अथवा संभ्रम निर्माण झालेला आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून गरजेशिवाय घराच्या बाहेर पडू नये व गर्दी करु नये, हे जरी खरे असले तरी रक्तदान हे गरजु रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण सद्यस्थितीत रक्तास कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. रक्तदान केल्यामुळे अथवा रक्तसंक्रणामुळे कोरोना विषाणुची लागण होत नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. 

कोरोनाच्या लढाईसोबतच रक्तदानाचे आवाहन स्विकारुया

तरी सर्व सामाजीक, धार्मीक संस्थांना व रक्तदात्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी रक्तादन शिबिरे आयोजीत करावी. गरजु रुग्णांसाठी रक्त संकलन करुन त्यांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त कार्यास अनमोल सहकार्य करावे. तसेच इच्छुक रक्तदात्यांनी त्यांच्या जवळच्या रक्तपेढीत जावून देखील रक्तदान करु शकतात. कोरोनाच्या भितीमुळे रक्तदान करण्यास घाबरु नका व गरजु रुग्णांचे प्राण वाचवा असे आवाहन करत कोरोनाच्या लढाईसोबतच रक्तदानाचे आवाहन स्विकारुया असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक यांनी सांगितले आहे.

येथे क्लिक करा - नांदेडला ‘यांनी’ दिला सामुहिक आत्मदहनाचा इशारा, कोणी ते वाचा...

अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये
 
सर्व रक्तदात्यांना विनंती आहे की, कोरोना आजार व त्यासंबंधित अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये.
रक्तदान करुन रुग्णास जीवनदान करणारे आपण रक्तदाते मानव सेवा करणारे सेवेव्रती आहात आणि अशा कठीण परिस्थितीत ही आपण आपले रक्तदान सेवा व्रत न डगमगता चालूच ठेवावे अशी आपल्याला नम्र विनंती आहे...
-डॉ. गंगाधर घुटे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus: An atmosphere of fear in blood donors nanded news