जायकवाडीच्या कालव्यात फेकल्या दोन ट्रॅक्टर कोंबड्या

Coronavirus News
Coronavirus News

गंगाखेड : गंगाखेड शहरापासून तीन किलोमीटरवरील जायकवाडीच्या उजव्या कालव्यात अज्ञात पोल्ट्रीचालकाने बुधवारी (ता.११) रात्री अंदाजे दोन ट्रॅक्टर बॉयलर कोंबड्या फेकल्या. 

सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचे सावट असून पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. कोरोना आणि कोंबडीसंदर्भात सोशल मीडियावर अफवा येत असल्यामुळे अनेकांनी चिकन बंद केले आहे. त्यामुळे विक्री रोडावली आहे. कोंबड्या पाळणे परवडत नसल्याने करावे काय, असा प्रश्न असल्याने व्यावसायिक दर कमी करण्यासह ‘सेल'सारख्या क्लृप्त्या शोधत आहेत. 

तरीही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कोंबड्यांची विल्हेवाट लावली जात आहे. व्यवसायच ठप्प झाल्याने वैतागलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील एका विक्रेत्याने हजारो कोंबड्या जमिनीत पुरून टाकल्या. त्यानंतर जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कोंबड्या आणून टाकल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

जायकवाडीच्या उजव्या कालव्यात पिकासाठी पाणी सोडण्यात आले आहे. सुरळवाडी येथून उजव्या कालव्याचे पाणी मन्नाथ तलावात येते. 
या कोंबड्या स्थानिकांनी टाकल्या किंवा अन्य कुणी याबाबत चर्चा सुरू आहे. यातील काही कोंबड्या कॅनॉलमधील पाण्यात वाहून मन्नाथ तलावात आल्या. सर्व कोंबड्या मृत असून, त्यावर अळ्या झाल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. पाणी दूषित होण्याचा धोका वाढला असून, त्यातून वेगळीच समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com