कोरोना रुग्ण आढळल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघांवर गुन्हा

अनिरुद्ध धर्माधिकारी
Sunday, 15 March 2020

एका तरुणाचा मित्र ऋषिकेश वीर याने त्याला फोन करून व्हॉत्सअप स्टेटस पाहा, असे सांगितले. त्याने स्टेटस पाहिले असता त्याचे छायाचित्र वापरून 'आष्टी तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला' तसेच विविध वृत्तवाहिन्यांची नावं वापरून 'कोरोना ब्रेक्रिंग, आष्टी शहरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला' व 'आष्टी शहरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ' असे तीन स्टेटस ठेवलेले आढळले.

आष्टी (बीड) : 'आष्टी तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला' अशी अफवा एकाचे छायाचित्र वापरून समाजमाध्यमांमधून पसरविणाऱ्या दोन जणांविरुद्ध पिडीत तरुणाच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसांत शनिवारी (ता. 14) रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

एका तरुणाचा मित्र ऋषिकेश वीर याने त्याला फोन करून व्हॉत्सअप स्टेटस पाहा, असे सांगितले. त्याने स्टेटस पाहिले असता त्याचे छायाचित्र वापरून 'आष्टी तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला' तसेच विविध वृत्तवाहिन्यांची नावं वापरून 'कोरोना ब्रेक्रिंग, आष्टी शहरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला' व 'आष्टी शहरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ' असे तीन स्टेटस ठेवलेले आढळले.

औरंगाबादेत कोरोना कन्फर्म, वाचा कुठे आढळला रुग्ण

हे पाहून मानसिक धक्का बसलेल्या तरुणानं घाबरून गेलेल्या अवस्थेत ऋषिकेश वीर यास स्टेटस काढून टाकण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत अनेक जणांनी 
त्याचे स्क्रिनशॉट काढून इतरत्र प्रसारित केले होते. त्यामुळे संबंधित तरुणास ओळखणाऱ्यांनी मोबाईलवरून त्याच्या तब्येतीची विचारणा करण्यास सुरवात केली.

त्यांना विचारणा केल्यानंतर त्याचे मित्र ऋषिकेश वीर व प्रथमेश आवारे या दोघांनी मोबाईलवर स्टेटस तयार करून ते सोशल मिडियावर पसरविले असल्याचे समजले. यावरून त्याने आष्टी पोलिसांत शनिवारी (ता. 14) त्याने दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार करपे हे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus Patient Ashti Beed Crime News