व्हिडिओ : ‘चीन म्हणजे कोरोनाची जननी’; भारूडातून जागृती

file photo
file photo

परभणी : कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर देशात लॉकडाउन झाले. सर्व व्यवहार ठप्प असल्याने प्रत्येकांना भरपूर वेळ मिळाला आहे. प्रत्येकांच्या अंगातील सुप्तगुणांना प्रदर्शित करण्याचा वाव मिळत आहे. पेडगाव (ता., जि. परभणी) येथील गृहिणी दमयंती कुलकर्णी यांनी सुद्धा त्यांच्यात लपलेला कलावंत या परिस्थितीमुळे जागा झाला आहे. या काळात या काकूंनी कोरोनावर गीते लिहून ते त्यांच्याच स्वरात स्वरबद्ध केले आहेत. त्यांचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यांच्या ‘चीन म्हणजे कोरोनाची जननी..’ हे भारूड सध्या सर्वात जास्त गाजत आहे. तसेच ज्ञानोपासक महाविद्यालयातील प्रा. राजकुमार मनवरदेखील लोकांनी घरी बसावे, हा संदेश देत लोकांच्या मनोरंजनाखातर रोज एक गाणे सादर करून ते सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत.

कोरोना विषाणू संसर्गामुळे देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. या परिस्थितीत अनेकजण स्वतःचा छंद जोपासत आहेत. नुसता छंदच जोपसत नसून त्यातून जनजागृतीचे कामदेखील करीत आहेत. पेडगाव (ता. परभणी) येथील रहिवाशी दमयंती राजेंद्र कुलकर्णी या गृहिणीनेदेखील कोरोना विषाणूवर निरनिराळी गीते स्वतः लिहून स्वरबद्ध केली आहेत. दमयंती कुलकर्णी या स्वतः कलावंत आहेत. भावगीते, भक्तिगीते, भजन, इतकेच काय तर भारूड म्हणण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी या लॉकडाउनच्या काळात घरातील कामे सांभाळून स्वतःचा छंदही जोपासला आहे. त्यांनी लिहिलेली व स्वरबद्ध केलेली अनेक गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
 दयमंती कुलकर्णी या त्यांचे महिला भजनी मंडळही चालवितात. त्यांच्या भजनी मंडळाची ख्याती अख्या मराठवाड्यात पसरलेली आहे. त्यांच्या या छंदाला त्यांचे पती राजेंद्र कुलकर्णी व मुलगा अतुल कुलकर्णी यांचे मोठे सहकार्य मिळत आहे.

गाण्यांना मिळते दाद
परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयातील प्रा. राजकुमार मनवर हे सध्या उत्तम गायक आहेत. त्यांनी ही जसे लॉकडाउन सुरू झाले तसे प्रत्येक दिवशी एक गाणे रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केले आहे. त्यांच्या या गाण्यांना दाद मिळत आहे. त्यांना त्यांचे सहकारी सुभाष जोगदंड, ललिता सिरसाट, कारभारी हजारे यांची साथ मिळत आहे.


गाणे म्हणजे माझा जीव
मला गाणे म्हणणे फार आवडते. त्यामुळे मी दिवसातील कामे करत असतांनाही गाणे आवर्जून म्हणत असते. या परिस्थितीत सरकार नागरीकांची किती काळजी घेत आहे हे सर्वांना कळावे यासाठी मी हे उत्साहित करणारे गाणे सादर करीत असते.
- दमयंती कुलकर्णी, गृहिणी, पेडगाव, ता. परभणी

प्रशासनानाचे आदेश पोचविणे
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगात होणारी महामारीपासून विचलित झालेल्या नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून मी हे गाणे सादर करीत आहे. यातून जनजागृती व प्रशासनानाचे आदेश ही लोकांपर्यत पोचवित आहे.
- प्रा. राजकुमार मनवर, परभणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com