‘या’ पालिकेने केला ‘कोरोना’ मुक्तीचा संकल्प

corona.jpg
corona.jpg


लोहा, (जि. नांदेड) ः ‘कोरोना’ला हरविण्यासाठी लोहा शहरवासीयांची साथ मोलाची ठरणार आहे. ‘माझे शहर, माझा देश’ पूर्णपने ‘कोरोना’ मुक्त करण्याचा संकल्प करूया... असे आवाहन या वेळी लोहा पालिकेने केले आहे. सद्या संपूर्ण जगात महामारी म्हणून भेडसावत असलेल्या कोरोना रोगाने आपल्या भारत देशात व राज्यात शिरकाव केला असून या महामारी कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी त्याचा फैलाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशभर जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश दिले आहेत.

जनता कर्फ्युचे तंतोतंत पालन करावे

यास संपूर्ण देशवासीय उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात जनतेने, व्यापाऱ्यांनी सर्वांनी जनता कर्फ्युचे तंतोतंत पालन करावे. लोहा पालिका शहरवासीयांच्या सेवेसाठी सदा तत्पर असून शहरात संपूर्ण साफ-सफाई स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ‘कोरोना’ला प्रतिबंध करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड व सर्व नगरपालिका चांगल्याप्रकारे परिस्थिती हाताळत आहेत. लोहा नगरपरिषद कार्यालय व संपूर्ण शहरात फवारणी सुरू केली आहे. लोहा शहरातील आठवडे बाजार बंद ठेवला आहे. आता खबरदारी म्हणून चौकशी करून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे.

लाऊडस्पीकरद्वारे जाहिरात

बाहेरून आलेल्या नागरिकांची आम्ही खबरदारी घेत आहोत तसेच लोहा शहरात नागरिकांना कोरोना विषयी माहिती कळावी यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या वेळी लाऊडस्पीकरद्वारे जाहिरात करण्यात येत असून अनेक बॅनर, पोस्टरद्वारे कोरोना रोखण्याच्या उपाय योजना सांगण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, स्वच्छता राखावी, खोकलतांना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. हस्तांदोलन करू नये, मांस व अंडी पूर्णपणे शिजवलेले खावे, अर्धवट शिजवलेले मांस मटण अंडी खाऊ नये. संचारबंदी लागु झाली असल्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरू नये,  अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दवाखाने मेडिकल व किराणा दुकान फक्त चालू राहतील या ठिकाणी गर्दी करू नका शासनाने केलेल्या सूचना आदेशाचे पालन सर्वांनी करावे असे सांगितले. 

हेही वाचा -  माहूरच्या खासगी डॉक्टरांच्या कार्याला ‘सलाम’
लोहा नगरपरिषद कर्मचारी यांना पुढील प्रमाणे नेमनुका केल्या आहेत. या मध्ये बाबाराव चव्हाण, वैजनाथ शेट्टे, चांदु राजकौर, राजेंद्र सरोदे, वार्ड क्रमांक १ ते १३ चा भाग ः सायाळ रोड राजाराम नगर, मुक्ताईनगर, बळीराजा मार्केट, बळीराम पवार, माधव पवार, सोमनाथ केंद्रे, वच्‍छलाबाई गव्हाणे, वार्ड क्रमांक ः २, १२, १३, १४ व १५ कलाल पेठ चव्हाण गल्ली, पवार गल्ली, भोई गल्ली संपूर्ण जुना लोहा शहर, शेषराव भिसे, नंदकिशोर अंकले, वार्ड क्रमांक ः ९ व १३ पोस्टामागील परीसर, शिवकल्याण नगर ढोरवाडा, साई गोल्डन सिटी, उल्हास राठोड, शंकर वाघमारे, बालाजी कदम, वार्ड क्रमांक ः चार, पाच, सहा व १७ आंबेडकर नगर, बालाजी मंदिर परिसर, बळीराजा मार्केट, इंदिरा नगर, पोलिस स्टेशन भाग ः जावई नगर, बेनाळ देवनेवाडी व तांडे असून लोहा शहरातील नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com