माहूरच्या खासगी डॉक्टरांच्या कार्याला ‘सलाम’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

clipart.png


माहूर तालुक्यातील खासगी डॉक्टर असोशिएशनने प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत सोमवार (ता. २३) पासून खासगी हॉस्पिटल बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आवश्यक तेवढे खासगी डॉक्टर उपलब्ध करून दिले जातील व तशी सेवा शासकीय रुग्णालयात देण्यात येईल, असे माहूर वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. निरंजन केशवे यांनी बैठकीत सांगीतले.

माहूरच्या खासगी डॉक्टरांच्या कार्याला ‘सलाम’


माहूर, (जि. नांदेड) ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार राज्यात झपाट्याने सुरू आहे. प्रशासन या कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. आरोग्य विभागासह सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. कमीत कमी मणुष्यबळामध्ये जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

निर्देशाचे पालन खासगी डॉक्टरांनी करावे
सोमवारी (ता. २३) माहूर तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माहूर तालुक्यातील खासगी डॉक्टर यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये या करिता खासगी हॉस्पिटल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात यावे, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या निर्देशाचे पालन खासगी डॉक्टरांनी करावे, असे आवाहन केले.

टप्प्याटप्प्याने सेवा देण्याची विनंती
त्याच बरोबर शासकीय रुग्णालयात टप्प्याटप्प्याने सेवा देण्याची विनंती केली. माहूर तालुक्यातील खासगी डॉक्टर असोशिएशनने प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत सोमवार (ता. २३) पासून खासगी हॉस्पिटल बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आवश्यक तेवढे खासगी डॉक्टर उपलब्ध करून दिले जातील व तशी सेवा शासकीय रुग्णालयात देण्यात येईल, असे माहूर वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. निरंजन केशवे यांनी बैठकीत सांगीतले.

हेही वाचा - ​ गुड न्युज : ५५ जणांचे अहवाल आले निगेटीव्ह


बैठकीस गटविकास अधिकारी विशालसिंह चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. एन. भोसले, नगर पंचायत मुख्याधिकारी विद्या कदम, पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे, अधीक्षक वैजनाथ स्वामी उपस्थित होते. या वेळी माहूर वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. निरंजन केशवे, डॉ. राम कदम, डॉ. प्रकाश जैन, डॉ. अजय जाधव, डॉ. पद्माकर जगताप, डॉ. सुप्रिया गावंडे, डॉ. अभिजित कदम, डॉ. जुनेद बावाणी, डॉ. उषा देशमुख, डॉ. राजेश सामशेट्टीवार, डॉ. शुभा डाखोरे, डॉ. बाबा डाखोरे यांच्यासह खासगी डॉक्टर मोठ्या संख्येने आढावा बैठकीस हजर होते.

इतर दुकाने कडकडीत बंद
जिल्ह्यात कलम १४४ लागू झाल्यानंतर पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पोलिस उपनिरीक्षक शरद घोडके, तिडके यांच्यासह पोलिस कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने कडकडीत बंद आहेत. रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.

loading image
go to top