coronavirus-बीडची धाकधूक वाढली, बंदोबस्तावरील पोलिस तबलिगींच्या संपर्कात

दत्ता देशमुख
Sunday, 5 April 2020

तबलिगी जमातमधील १२ जणांचा जालना जिल्ह्याच्या हद्दीतून उस्मानाबाद जिल्हा हद्दीत प्रवेश करताना शहागड व चौसाळा चेकपोस्ट येथील पोलिसांशी संपर्क आल्याचा संशय आहे. त्यामुळे २८ पोलिसांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

बीड - आतापर्यंत कोरोना उपाययोजनांच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व सामान्यांकडून पालन होत असताना आणि रविवारपर्यंत (ता. पाच) कोरोना रुग्णांबाबत शून्यावर असलेल्या बीडकरांची आता काळजी वाढली आहे.

तबलिगी जमातमधील १२ जणांचा जालना जिल्ह्याच्या हद्दीतून उस्मानाबाद जिल्हा हद्दीत प्रवेश करताना शहागड व चौसाळा चेकपोस्ट येथील पोलिसांशी संपर्क आल्याचा संशय आहे. त्यामुळे २८ पोलिसांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यातील काहींचे गरजेनुसार स्वॅबही घेतले जाणार आहेत. 
दिल्ली येथील तबलिगी जमातमध्ये सहभाग घेतलेल्या १२ जणांपैकी आठ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा -  ‘हे’ माध्यम आहे एकाग्रता वाढविण्यासाठी झक्कास, कोणते? ते वाचाच   

दरम्यान, हे लोक जालन्याहून लातूरकडे जाताना त्यांना बीड पोलिसांनी शहागड चेकपोस्टवर अडविले. त्यावेळी त्यांनी पोलिसांसोबत हुज्जतही घातली होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या मार्गे जिल्हा हद्दीतून उस्मानाबदकडे प्रवेश करताना चौसाळा येथील चेकपोस्टवरही त्यांचा पोलिसांशी संपर्क आला होता. या दोन्ही ठिकाणच्या पोलिसांना तातडीने आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले आहे. गरजेनुसार या पोलिसांचे स्वॅबही घेतले जाणार आहेत. या लोकांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचा आकडा २८ आहे. 

हेही वाचा - वर्तमानपत्रे आहेत समाजमनाचा आरसा

बीडचा बेत फसल्याने शहागडला मुक्काम 
दरम्यान, तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेले हे लोक जालन्याहून निघून बीडला मुक्काम करणार होते; परंतु जिल्ह्यातील १४ ठिकाणी चेकपोस्ट करून तपासणी करण्यात येत होती. यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहागड चेकपोस्ट येथे रात्रीच्या वेळी पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी या लोकांनी पोलिसांशी हुज्जतही घातली; परंतु परत फिरावे लागल्याने त्यांनी शहागडला मुक्काम केला. दरम्यान, दुसऱ्या मार्गाने त्यांनी लातूरला जाताना पुन्हा त्यांना चौसाळा चेकपोस्टवर अडविले. या दोन्हीवेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. 

हेही वाचा - मृत्यूनंतरही इथे भोगाव्या लागतात मरणयातना... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus- Beed Police Health Check