esakal | सलून दुकाने पाच दिवस बंद राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad News

महाराष्ट्र नाभिक महामंडळाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर २४ मार्चपर्यंत सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सलून दुकाने पाच दिवस बंद राहणार

sakal_logo
By
राजेंद्रकुमार जाधव

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सलून दुकाने शुक्रवारपासून (ता. २०) पाच दिवस म्हणजे २४ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखेच्या वतीने घेण्यात आला आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखेच्या वतीने तसे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता. १९) देण्यात आले आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांच्या आदेशानुसार जिल्हा शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने अध्यक्षस्थानी होते. देशभरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकरवी सकारात्मक निर्णय घेऊन जिल्ह्यातील सर्व सलून दुकाने २० ते २४ मार्च या कालावधीत पाच दिवसांकरिता बंद ठेवून सहकार्य करण्याचे या बैठकीत ठरले.

वाचा ः लग्नाच्या बैठकीतच जोडप्याने म्हटले ‘कबुल हैं’, कोरोनामुळे कुटुंबीयांचा निर्णय

याशिवाय मुंबई, पुणे व अन्य ठिकाणांहून येणाऱ्या व्यक्तींद्वारे सलून दुकानात दाढी व कटिंग करण्यासाठी या व्यक्तीच्या संपर्कातील असल्याकारणाने हा आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची दाट शक्यता असल्याने ते टाळण्यासाठी व जनतेच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व सलून दुकाने पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दुकाने पाच दिवस बंद ठेवत असल्याचे पत्रही संघटनेच्या 
पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष माने, कार्याध्यक्ष धनंजय राऊत, सरचिटणीस जगन्नाथ पवार, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष किशोर राऊत, शहराध्यक्ष व्यंकट पवार, ज्ञानेश्वर पंडित, दत्ता भालेकर, शंकर गोरे, अमोल चौधरी, सूर्यकांत पवार, उमेश सूर्यवंशी, बाबा गायकवाड, सत्यजित राऊत यांच्यासह नाभिक समाजातील नागरिक उपस्थित होते.