esakal | जनजागृती, लसीकरण, दंडात्मक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

जनजागृती, लसीकरण, दंडात्मक कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : महानगरपालिकेने शहरातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आता कसोसीने प्रयत्न सुरू केले आहेत. जनजागृती, लसीकरण व दंडात्मक कारवाई या त्रिसूत्रीचा पालिका अवलंब करीत असून निर्माण झालेला दबाव कायम ठेवल्यास लसीकरणाची टक्केवारी निश्चित वाढू शकते.जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी रविवारी (ता.१२) बाजारपेठेत उतरून केलेल्या धडाकेबाज कारवाईनंतर लस न घेतलेल्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे लस न घेणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला असून बाजारपेठेत खास उभारलेल्या केंद्रात गर्दी वाढू लागली आहे.

मंगळवारी (ता.१४) महानगरपालिकेने शालीमार फंक्शनल हॉल येथे विविध धर्मीयांचे धर्मगुरु, भंतेजी, मौलवींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व धर्मगुरुंनी आपल्या धर्मातील नागरीकांना लसीकरण करुन घेण्याच्या आवाहन करावे, असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले.
यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, रविंद्र सोनकांबळे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, मुफ्ती इब्राहिम खासमी मौलाना, रफीयोद्दीन आश्रफी मुफ्ती सईद, मुफ्ती अब्दुल खुद्दुस, मौलाना शेख वसीम, मौलाना अनवर, मौलाना निसार, मौलाना झहीर अब्बास, मौलाना जब्बार, हाफेज इलियास, हाफेज रियाज, मुफ्ती अब्दुल हादी, महापालिका सदस्य गणेश देशमुख, सुनील देशमुख, सचिन देशमुख, चंद्रकांत शिंदे, जाकेर लाला, पाशा कुरेशी, मो. फहाद, मोईन मौलवी, महेमुद खान, चंदु लव्हाळे, अ‍ॅड. मुजाहेद खान, बबलू नागरे आदी उपस्थित होते. यावेळी धर्मगुरुंनी आपल्या समाजाला तर आवाहन केलेच परंतु तेथेच स्वतःचे देखील लसीकरण करून घेतले.

हेही वाचा: धक्कादायक; बीडमध्ये रस्त्याने घेतला महिलेचा बळी;पाहा व्हिडिओ

दबाव कायम ठेवण्याचे पालिकेपुढे आव्हान
शहरातील १८ वर्षावरील दोन लाख २५ हजार नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे अपेक्षीत आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. शहरात फक्त ६५ हजार नागरीकांनीच लसीचा पहिला डोस घेतला असून ही टक्केवारी ३० देखील नाही. तर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ३६ हजारावर आहे. याचा अर्थ निम्म्या जणांनी अजुनही दुसरा डोस देखील घेतला नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने निर्माण झालेला दबाव कायम ठेवण्याचे मोठे आव्हान पालिकेपुढे आहे.

loading image
go to top