corporator prashant kale
sakal
लोहारा (जि. धाराशिव) - लोहारा नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पातून लाखो रुपयांच्या खत चोरी प्रकरणात चौकशी समितीने कामकाजच न केल्याने नाराज विद्यमान नगरसेवक प्रशांत काळे यांनी शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी नगरपंचायत इमारतीवर चढून पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच उपस्थित नगरपंचायत कर्मचारी, पोलीस आणि नागरिकांनी तत्परता दाखवून काळे यांना रोखल्याने मोठी दुर्घटना टळली.