Santosh Deshmukh Case : चाटेसह चौघांच्या कोठडीत वाढ; हत्या, खंडणीसह सर्व गुन्हे एकमेकांशी निगडित असल्याचा दावा
Santosh Deshmukh Case Police Custody Extension : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौघा आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत सहा जानेवारीला संपली, आणि न्यायालयाने विष्णू चाटे यांच्या कोठडीत पाच दिवसांची, तर इतर तीन आरोपींना १२ दिवसांची कोठडी वाढवली आहे.
केज : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेले तिघे व खंडणीच्या आरोपाखाली अटकेतील एक अशा चौघांची पोलिस कोठडीची मुदत सहा जानेवारीला संपली. सोमवारी या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.