
उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी (ता.दोन) २६ जणांना कोरोनाची लागण झाली असुन एकाचा मृत्यु झाला आहे. बुधवारी ३८ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
उस्मानाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.दोन) २६ जणांना कोरोनाची लागण झाली असुन एकाचा मृत्यु झाला आहे. बुधवारी ३८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के असुन मृत्युदर ३.४९ टक्के एवढा झाला आहे. जिल्ह्यात आलेल्या २६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी उस्मानाबादमध्ये १५ जणांना लागण झाली आहे. कळंब पाच, उमरगा, लोहारा, परंडा या तीन तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
तुळजापुर, वाशी व भूम या तीन तालुक्यात एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही. १५३ संशयितांची स्वॅब चाचणी घेण्यात आली असुन त्यातील नऊ जणांना लागन झाली आहे. तर २१९ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यातील १७ जण बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील ६९ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे.
उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १५८०२
बरे झालेले रुग्ण - १५००५
उपचाराखालील रुग्ण- २४५
एकुण मृत्यु - ५५२
आजचे बाधित - २६
आजचे मृत्यु - ०१
संपादन - गणेश पिटेकर