esakal | Corona Updates: जालना जिल्ह्यात ४५ कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Covid

आतापर्यंत एक हजार ५० जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. दरम्यान शुक्रवारी १०४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Corona Updates: जालना जिल्ह्यात ४५ कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात (Jalna) शुक्रवारी (ता.११) उपचारानंतर १०४ रूग्ण कोरोनामुक्त (Corona) झाले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. विविध भागात नव्याने ४५ रूग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात ४७६ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा कमी झाला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ४५ रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जालना शहरात दोन, तालुक्यातील नागेवाडी येथील दोन, सावरगाव हडप, वझर सरकटे, चितळी पुतळी, झिर्पी येथील प्रत्येकी एक, मंठा तालुक्यातील किनखेडा येथील एक, परतूर तालुक्यातील आष्टी, हस्तूर तांडा, आकोली येथील प्रत्येकी एक, घनसावंगी शहरातील सहा, तालुक्यातील आरगडे गव्हाण येथील पाच, भोगगाव, तळेगाव, भणंग जळगाव, रवना येथील प्रत्येकी एक, अंबड शहरातील एक, तालुक्यातील डोमेवाडी, काजळा येथील प्रत्येकी एक, बदनापूर शहरातील एक, जाफराबाद तालुक्यातील भारज येथील दोन, वरूड, कुंभारझरी येथील प्रत्येकी एक, भोकरदन शहरातील एक, तालुक्यातील प्रल्हादपूर, चिंचोली, लिंगेवाडी, चांदई टेपली, सोमनाथ जळगाव येथील प्रत्येकी एक व इतर जिल्ह्यातील चार जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ६० हजार ७४९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर शुक्रवारी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी आतापर्यंत एक हजार ५० जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. दरम्यान शुक्रवारी १०४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ५९ हजार २२३ रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. (Covid 45 Cases Reported In Jalna District)

हेही वाचा: वैजापूरच्या गटविकास अधिकाऱ्याला दांपत्याकडून बेदाम मारहाण

व्हेंटिलेटरवर १६ रूग्ण

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांपैकी १४९ रूग्ण हे होम क्वारंटाईन असून ३० रूग्ण हे संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर ४२८ रूग्ण हे रूग्णालयात दाखल आहेत. यामध्ये ९८, ऑक्सिजनवर २९४, व्हेंटिलेटरवर १६ रूग्ण आहेत.