esakal | उस्मानाबाद जिल्ह्यात १६१ जणांना कोरोना, चौघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus Patient

उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२१) १६१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असुन चार जणांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडुन देण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ९७ जण आरटीपीसीआर, तर ६३ जण हे जलद अँटिजेन चाचणीमधून आले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात १६१ जणांना कोरोना, चौघांचा मृत्यू

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद :  जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२१) १६१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असुन चार जणांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडुन देण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ९७ जण आरटीपीसीआर, तर ६३ जण हे जलद अँटिजेन चाचणीमधून आले आहेत. एक जण बाहेर जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यामध्ये चार जणांचा मृत्यु झाले आहे. त्यामध्ये उमरगा येथील बालाजी मार्केट येथील ६० वर्षीय पुरुषाचा सोलापुर येथील खासगी रुग्णालयामध्ये शनिवारी (ता.१५) मृत्यु झाला आहे.

वाचा : उस्मानाबादेत बाप्पांच्या आगमनासाठी कर्फ्यूत शिथिलता, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी गावच्या ७३ वर्षीय पुरुषाचा उस्मानाबाद येथील एका खासगी दवाखान्यामध्ये गुरुवारी (ता.२०) मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद शहरातील शाहुनगर भागातील ६५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालय येथे गुरुवारी (ता.२०) रोजी मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील चिंचपुर येथील ५९ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालय येथे जुलै (ता.३०) रोजी मृत्यु झाला आहे. तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती बघता उस्मानाबाद ४३, तुळजापुर १५, उमरगा ३५, कळंब २४, परंडा १३, लोहारा पाच, भूम १८, वाशी आठ अशी रुग्णसंख्या आहे.

हेही वाचा : आरटीई प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत,एकशे बावन्न विद्यार्थ्यांची निवड

जलद अँटिजेन चाचणी वाढल्या असुन उस्मानाबाद तालुक्यामध्ये पॉझिटिव्हची संख्या अधिक येत असल्याचे चित्र आहे. त्रेचाळीसपैकी ३० जण जलद अँटिजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. इतर तालुक्यामध्ये मात्र आरटीपीसीआर येथे पॉझिटिव्ह आल्याची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यामध्ये एकुण ७९९ इतक्या जलद अँटिजेन चाचणी करण्यात आल्या होत्या, तर स्वॅब ३०४ घेण्यात आले होते. ते कोरोना चाचणी केंद्रात पाठविण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढुन आता चार हजार २२३ इतकी झाली आहे. यामध्ये दोन हजार ४५२ इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या एक हजार ६५१ इतक्या रुग्णावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील एकुण मृत्यू झालेल्यांची संख्या १२० वर गेली आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)

loading image
go to top