उस्मानाबाद जिल्ह्यात १६३ जणांना कोरोना, सहा जणांचा मृत्यू

तानाजी जाधवर
Monday, 14 September 2020

उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये सोमवारी (ता.१४) १६३ जणांना कोरोनाची लागण झाली असुन सहा जणांचा मृत्यु झाला आहे. दिवसभरामध्ये साडेपाचशे रुग्णांवर उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ७५.३५ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण, तर मृत्युचा दर २.९० टक्के एवढा झाला आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये सोमवारी (ता.१४) १६३ जणांना कोरोनाची लागण झाली असुन सहा जणांचा मृत्यु झाला आहे. दिवसभरामध्ये साडेपाचशे रुग्णांवर उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ७५.३५ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण, तर मृत्युचा दर २.९० टक्के एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये सात हजार ८८१ एवढ्या व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असुन ९१७ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईमध्ये आहेत.

‘आरटीई’त गैरप्रकार उघड, खोट्या माहितीवर शाळेत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न

मृत्यु होणाऱ्यामध्ये चार जण उस्मानाबाद तालुक्यातील असून भुम व परंडा तालुक्यातील प्रत्येक एक जणाचा मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा येथील ६० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये तर पळसप गावातील ७९ वर्षीय पुरुषाचा लातुर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कामेगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाचा तसेच तेर येथील ६० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे.

भुम तालुक्यातील पाटसांगवी येथील ५० वर्षीय स्त्रीचा बार्शी येथील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. परंडा येथील खंडारी गावच्या ५२ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. जिल्ह्यामध्ये १६३ रुग्णापैकी ७५ जण आरटीपीसीआरद्वारे तर ७६ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तर बारा जण परजिल्ह्यात बाधित झाले आहेत. उस्मानाबादमध्ये ५४ जण बाधित झाले असुन यामध्ये ३२ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर १६ जण आरटीपीसीआरमधून बाधित झाल्याचे समोर आले आहे.

जालना जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; आंदोलने, उपोषण, मोर्चे आणि निदर्शने...

सहा जण परजिल्ह्यात बाधित झाले आहेत. तुळजापुर येथील २५ जण पॉझिटिव्ह आले असुन आरटीपीसीआरद्वारे १२ तर १३ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उमरगा येथील २४ जण बाधित झाले आहेत. त्यातील १९ जण आरटीपीसीआरद्वारे तर चार जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कळंब तालुक्यातील १८ जण बाधित झाले असुन त्यामध्ये नऊ जण आरटीपीसीआरद्वारे नऊ जण व आठ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंडा नऊ जण बाधित आढळले असुन लोहारा दहा, भुम दहा व वाशी तेरा जणांना कोरोनाची लागन झाली आहे. जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढुन आठ हजार ६९७ त्यातील सहा हजार ५५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या एक हजार ८९२ रुग्णावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २५२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 163 Patients In Osmanabad District