उस्मानाबाद जिल्ह्यात २४९ जणांना कोरोना, सात रुग्णांचा मृत्यू

तानाजी जाधवर
Sunday, 13 September 2020

जिल्ह्यामध्ये रविवारी (ता.१३) २४९ रुग्णांना कोरोनाची लागण, तर सात जणांचा कोरोनाने मृत्यु झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळुन आले आहे. सात जण मृतांमध्ये तुळजापुर दोन, कळंब दोन, उमरगा दोन व परंडा तालुक्यातील एक येथील रुग्णांचा समावेश आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये रविवारी (ता.१३) २४९ रुग्णांना कोरोनाची लागण, तर सात जणांचा कोरोनाने मृत्यु झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळुन आले आहे. सात जण मृतांमध्ये तुळजापुर दोन, कळंब दोन, उमरगा दोन व परंडा तालुक्यातील एक येथील रुग्णांचा समावेश आहे. तुळजापुर तालुक्यातील मसला (खु) येथील ५७ वर्षीय पुरुष, सावरगाव येथील ६५ वर्षीय पुरुष या दोन्ही रुग्णांचा तुळजापुर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला.

शेतकरी आत्महत्याबाबत उदासीनता का? बँकांकडून २५ टक्केही कर्जपुरवठा नाही

कळंब तालुक्यातील मस्सा येथील ७३ वर्षीय पुरुषाचा उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला आहे. तालुक्यातीलच पिंपळगाव डोळा येथील ५५ वर्षीय स्त्रीचा बार्शी येथील खाजगी रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. उमरगा तालुक्यातील नाईचाकुर येथील ५५ वर्षीय स्त्रीचा उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच आलुर येथील ७५ वर्षीय पुरुषाचा सोलापुर येथील खाजगी रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. परंडा तालुक्यातील साकत गावच्या ५५ वर्षीय स्त्रीचा बार्शी येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

जिल्ह्यामध्ये रविवारी आलेल्या २४९ रुग्णांपैकी १२२ जण आरटीपीसीआरद्वारे, तर १२० जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच सात जण इतर जिल्ह्यात बाधित झाले आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात १०४ रुग्णाची वाढ झाली आहे. यामध्ये २९ जणांचे आरटीपीसीआर व ७३ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यातही ग्रामीण भागामध्ये आता प्रसार वाढला असुन अनेक नव्या गावामध्ये कोरोनाचे लोन पोहचल्याचे दिसुन येत आहे.

रुग्णांकडून बिलाच्या नावावर लूट सुरु, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकार कधी थांबणार?

तुळजापुर येथे २८ जण बाधित झाले असुन त्यामध्ये १८ जण आरटीपीसीआरद्वारे तर दहा जणाची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उमरगा २७ जणाना कोरोनाची लागण झाली असुन त्यामध्ये २१ जण आरटीसीपीआरद्वारे तर सहा जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कळंब एक आरटीपीसीआरद्वारे एक १८ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. परंडा तालुक्यातील ११ जण तर लोहारा १८, भूम २१, वाशी २० अशी तालुकानिहाय आकडे वाढल्याचे दिसुन येत आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 249 Patients In Osmanabad District