esakal | हिंगोली : घोळवा येथील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू

बोलून बातमी शोधा

 COVID-positive died due Dist Hingoli

संपर्कातील ३२ जणांना केले क्वारंटाइन

हिंगोली : घोळवा येथील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील घोळवा येथील एका ७१ वर्षीय पुरुषावर हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोना आजाराने त्यांचा मृत्यू झाला. सदरील रुग्णास हृदयविकाराचा आजार होता. काही दिवस नांदेड येथे उपचार सुरू होते. त्यानंतर हैद्राबाद येथे भरती करण्यात आले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या संपर्कातील ३२
जणांना क्वारंटाइन करून त्यांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना विषाणूचे २७० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २३८ रुग्ण बरे झसल्यामुळे त्यांना घरी सुटी देण्यात आली. आजघडीला एकूण ३२ रुग्णावर उपचार सुरू आहेत. तसेच वसमत येथील कोरोना सेंटर येथे दोन रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये चंदगव्हाण एक, वसमत शहर एक यांचा समावेश आहे. याशिवाय कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर
येथे एकूण पंधरा रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये काजी मोहल्ला सहा, कवडा सहा, गुंडलवाडी दोन, बाबळी एक यांचा समावेश असून, त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत. तर डेडी केटेट कोविड सेंटर येथे दोघांवर उपचार सुरू आहेत. यात एक एसआरपीएफ जवान, भोसी येथील एक यांचा समावेश आहे.

कोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती उच्च न्यायालयात जाणार 

शहरातील लिंबाळाअंतर्गत कोविड सेंटर येथे सहा रुग्णावर उपचार सुरू आहेत. यात तालाब कट्टा दोन, रिसाला दोन, केंद्रा दोन, यांचा समावेश आहे तर सेनगाव येथे पाच रुग्णांवर तर औंढा येथे दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड कोरोना सेंटर व गाव पातळीवर क्वारंटाइन सेंटरमध्ये ४,७११ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ४२१७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ४,१९१ रुग्णांना घरी सुटी देण्यात आली आहे. सद्यःस्थितीत ५१२ व्यक्ती भरती असून, २६० जणांच्या चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : अखेर ‘त्या’ सोयाबीन उत्पादक कंपनीवर नांदेडात गुन्हा दाखल