
उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता. १०) केवळ सात कोरोना रुग्णांची भर पडली. दुसऱ्या टप्प्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १०) केवळ सात कोरोना रुग्णांची भर पडली. दुसऱ्या टप्प्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाच्या भीतीने अनेकांना हैराण केले होते. थंडीचे दिवस असल्याने दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग वाढेल अशी भीती अनेकांना होती. मात्र, आता कोरोना संसर्गाची वाढ आटोक्यात असल्याचे चित्र सध्या आहे. गुरुवारी जिल्ह्यात ८४ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.
यातील केवळ तीनजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर २२३ जणांची अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. यामध्येही केवळ चारच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित २१९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. म्हणजेच जिल्ह्यात गुरुवारी एकूण सातच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. दोन दिवसांपासून कोरोनाने एकही रुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे सध्यातरी कोरोनाचा धोका कमी झाला असल्याचे चित्र दिसत आहे.
Edited - Ganesh Pitekar