esakal | Corona Updates : जालना जिल्ह्यात सध्या फक्त ७२ कोरोना रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona 1

Corona Updates : जालना जिल्ह्यात सध्या फक्त ७२ कोरोना रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यातील Jalna विविध भागात मंगळवारी (ता.१३) नवीन पाच कोरोना Corona रुग्णांची भर पडली. डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ७२ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात मंगळवारी विविध भागात नव्याने पाच कोरोना रुग्णांची भर पडली. यात परतूर Partur शहरात एक, अंबड Ambad शहरात एक, चुरमापुरीत एक, इतर जिल्ह्यातील बुलडाणा Buldana येथे दोन असे पाच जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यात आरटीपीसीआरद्वारे ४, तर अँटीजेन तपासणीद्वारे एक असे एकूण पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे. covid19 72 active cases in jalna district gpl88

हेही वाचा: औरंगाबादेत कोरोना लसीकरणाचा पाच लाखांचा टप्पा पूर्ण

जिल्‍ह्यात आतापर्यंत ६१ हजार ३१९ कोरोनाबाधितांपैकी ६० हजार ७३ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ७२ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अंबडच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात १३ जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. उपचारादरम्यान मंगळवारी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत एक हजार १७४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण स्थिती

एकूण कोरोनाबाधित - ६१ हजार ३१९

एकूण कोरोनामुक्त - ६० हजार ७३

एकूण मृत्यू - १ हजार १७४

उपचार सुरू - ७२

loading image