
शेंदूरवादा : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा शेंदूरवादा (ता.गंगापूर, जिल्हा. छत्रपती संभाजीनगर)भागातील दौरा सबंधित कृषी केंद्र चालकांच्या चांगलाच अंगलट आला आहे. चौकशी पथकाने त्या-त्या दुकानाची तपासणी करून सुनावणीअंती जिल्हा कृषी विभागाने शनिवार (ता.14) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक कृषी सेवा केंद्रचालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला, तर अन्य एकाचा परवाना ३१ मार्चपर्यंत आणि अन्य आठ दुकानांचे परवाने ९० दिवसांसाठी निलंबित केल्याने कृषी सेवा केंद्र चालकात खळबळ उडाली आहे.